• Mon. Jun 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

सदा सरवणकरांना 24 तासांचा अल्टिमेटम; अमित ठाकरेंवरुन शिवसेनेत गदारोळ

ByEditor

Oct 27, 2024

मुंबई : माहीम मतदारसंघावरुन महायुतीत गदारोळ सुरु असल्याचं चित्र आहे. मनसेकडून अमित ठाकरे यांना माहीममधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांना पाठिंबा दिला जावा अशी महायुतीची भूमिका आहे. मात्र सदा सरवणकर माघार घेण्यास इच्छुक नाहीत. सदा सरवणकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांमध्ये शिष्टाईचे प्रयत्न सुरू असल्याचं समजत आहे. यादरम्यान एक मोठी घडामोड समोर आली असून, एकनाथ शिंदे यांनी सदा सरवणकर यांना 24 तासांचा अल्टिमेटम दिला आहे.

सदा सरवणकर यांना आपली यांना भूमिका ठरवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 24 तासांची मुदत दिली आहे. नुकतीच सदा सरवणकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. महायुती माहीम विधानसभा मतदारसंघात मनसेचे उमेदवार अमित राज ठाकरेंना पाठिंबा देण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सदा सरवणकर यांना सांगितलं आहे. राज ठाकरे यांनी लोकसभेला मदत केली होती. यापुढेही त्यांची मदत होईल असं एकनाथ शिंदे यांनी सदा सरवणकर यांना सांगितलं असल्याचं समजत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!