• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महावितरणचा लाचखोर कार्यकारी अभियंत्याला एक दिवसाची पोलीस कोठडी

ByEditor

Jul 20, 2023

अमूलकुमार जैन
अलिबाग :
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळाचे पोल बदलुन तसेच नवीन पोल बसवण्याकरिता सात हजार रुपयांची लाच घेणाऱ्या महावितरण कंपनीच्या लाचखोर कार्यकारी अभियंता गणेश तुकाराम पाचपोहे (वय 55 वर्षे, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, गोरेगाव विभाग, रायगड, वर्ग 1, रा. व्हर्टेक्स साॅलिटर, फ्लॅट नं ए2/1203, वारले नगर, कल्याण पश्चिम, जिल्हा ठाणे. 2) चिंचवली वाडी, गोरेगांव, माणगाव, रायगड) याला माणगाव येथील न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

गणेश तुकाराम पाचपोहे या लाचखोर कार्यकारी अभियंता यांनी तक्रारदार यांच्या राहते घराचे जवळ असलेल्या इलेक्ट्रिक पोल शिफ्ट करण्याकरिता व नवीन इलेक्ट्रिक पोल बसविण्याकरिता 7,000/- रुपये लाचेची मागणी दि. 18 जुलै 2023 रोजी मागणी केली होती. मात्र, तक्रारदारास लाच देणे मान्य नसल्याने याबाबत तक्रारदार यांनी तातडीने लाच लुचपत विभागाकडे धाव घेत तक्रार केली. त्यानुसार, लाच लुचपत विभाग रायगड यांनी तक्रारदारांनी केलेल्या अर्जाची पडताळणी केल्यानंतर दि. 19 जुलै 2023 रोजी गोरेगाव येथील त्यांच्या कार्यालयाजवळ सापळा रचण्यात आला. आरोपी लोकसेवक गणेश पाचपोहे याला तक्रारदार यांच्याकडून सात हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. लाचखोर अभियंता याला आज लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने माणगाव येथील न्यायालयात हजर केले असता त्यास एक दिवसाची पोलीस कोठडी सुनविण्यात आली आहे.

सदर कारवाई ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक शशिकांत पाडावे यांच्या मार्गदर्शनाखाली,पोलीस निरिक्षक रणजीत गलांडे, सहाय्यक फौजदार अरुण करकरे,सहाय्यक फौजदार विनोद जाधव, पोलीस हवालदार महेश पाटील, पोलीस हवालदार कौस्तुभ मगर, पोलीस हवालदार विवेक खंडागळे पोलीस नाईक सचिन आटपाडकर यांनी केली होती.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!