• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माणगावात एसटी बसला खासगी बसची धडक; एसटी चालक जखमी

ByEditor

Jul 21, 2023

सलीम शेख
माणगाव :
माणगावात एसटी बसला भरधाव वेगाने येणाऱ्या खाजगी बसची धडक लागून झालेल्या अपघातात एसटी बसचा चालक जखमी होऊन दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. सदरील अपघात शुक्रवार दि. २१ जुलै २०२३ रोजी पहाटे ३:३० वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघाताची फिर्याद एसटी बसचा चालक नितीन शरद चौधरे (वय -३६) रा. श्रीवर्धन एसटी डेपो मूळ रा. चौसाळा जि. बीड यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.

सदर अपघाताच्या गुन्ह्याबाबत माणगाव पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, आपघाताची फिर्याद देणारे एसटी चालक नितीन शरद चौधरे हे त्यांच्या ताब्यातील एसटी बस क्र. एमएच ०६ डीडब्लू ८०११ ही गाडी मुंबई सेंट्रल येथून गोरेगाव मार्गे बागमांडला श्रीवर्धन येथे घेऊन जात असताना त्यांची गाडी माणगावात मुंबई-गोवा महामार्गाच्या रस्त्यावर माणगाव काळ नदीच्या पुलापुढे राऊत हॉस्पिटलच्या जवळ आली असता आरोपी नासीर अहमद शेख (वय -४८) रा. गोवा यांनी त्यांच्या ताब्यातील खाजगी बस क्र. जी.ए. ०५ एफ ०००१ टीसी ००१२ ही गाडी आतिवेगाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत चालवून फिर्यादी यांच्या ताब्यातील एसटी बसला समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात फिर्यादी एसटी बस चालकाला दुखापती होऊन ते जखमी झाले. तसेच दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. या अपघाताच्या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात काँ.गु.रजि.नं २४९/२०२३ भादवी संहिता कलम २७९, ३३७, ३३८ मोटरवाहन अधिनियम १९८८ चे कलम १८४ प्रमाणे करण्यात येऊन आरोपी खासगी बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर अपघाताचा अधिक तपास माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गर्शनाखाली पोलीस हवालदार गणेश समेळ हे करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!