जीव धोक्यात घालून कुठल्याही गोष्टींचा आनंद घेऊन नका असं वारंवार सांगण्यात येतं. पण आपण जेव्हा निसर्गाच्या सान्निध्यात जातो, तेव्हा डोळ्यासमोरील नयनरम्य दृश्य पाहून हरपून जातो. पण काही पर्यटन स्थळ अशी असतात जिथे तुमची एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. तसंच एक ठिकाण आहे, ते म्हणजे समुद्र किनाऱ्या…वरती निळ आकाश आणि खाली स्वच्छ सुंदर असा समुद्र…समुद्राच्या पाण्यात आनंद लुटताना आपण अनेक पर्यटक पाहिले आहेत. पण हा शांत समुद्र जेव्हा आपलं रौद्ररुप दाखवतं तेव्हा ते आपल्या जीवावर बेतू शकतं. समुद्रकिनाऱ्यावर जाताना लाटांचा अंदाज घेणं खूप महत्त्वाच आहे. तुमची एक चूक मोठ्या संकटाला आमंत्रण देऊ शकते.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये मायलेकी समुद्र किनाऱ्यावर बसल्या असताना अचानक मोठी लाट आली अन् क्षणात…या मायलेकीची एक चूक त्यांना किती महागात पडली याच हे उत्तम उदाहरण आहे. तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता, मायलेकीची जोडी समुद्र किनाऱ्यावर खूप धोक्याचा ठिकाणी बसले आहेत. त्यांना वाटलं आपण समुद्रात पाय टाकून बसू आणि त्याचा आनंद घेऊ. पण त्याचा हा मोह आणि तिची एक चूक त्यांच्या जीवावर बेतली. त्या मायलेकी आरामात बसलेल्या असताना समुद्राच्या लाट्या त्यांना येऊन आदळत होता. पण एका क्षणाला समुद्राची एक मोठी लाट त्यांनी आदळली आणि आपल्या सोबत खोल समुद्रात घेऊन गेली.
एक क्षण वाटलं आता या दोघी वाचणार नाही. त्या दोघींनी एकमेकींचा हात घट्ट धरून ठेवला होता. समुद्राच्या लाटामुळे त्या मायलेकी पुन्हा समुद्र किनाऱ्याकडे यायच्या मात्र दुसरी लाट त्यांना पुन्हा आत खेचायची. दीड मिनिट जीवन-मरणाची लढाई या व्हिडीओमध्ये पाहिला मिळते. शेवटच्या क्षणापर्यंत मायलेकीने एकमकींचा हात सोडला नाही. एकदा त्या किनाऱ्याकडे आल्या तेव्हा एक मुलगा त्यांना वाचवण्यासाठी पुढे आला पण तो मदत करणार त्यापूर्वीच त्या पुन्हा समुद्रात खेचल्या गेल्यात. समुद्रातील लाट्यांमध्ये त्यांचा जीवन मरणाची लढाई सुरु होती. तेवढ्यात दोन व्यक्ती तिथे आले आणि त्यांनी या मायलेकीचा जीव वाचवला. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता अनेक वेळा असं वाटतं बस आता त्यांना वाचवणे अशक्य आहे. पण देव तारी त्याला कोण मारी असा प्रत्यय आला. हा भयानक 1.5 मिनिटांचा व्हिडीओ आतापर्यंत 17 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला.
या व्हिडीओवर सोशल मीडिया यूजर्स सातत्याने कमेंट करत आहेत. कोणीतरी म्हंटलं की लाटांनी त्याला किनाऱ्यावर सोडलं, तर कोणी लिहिलं, ‘एवढ्या जोराच्या लाटांमध्ये किनाऱ्यावर बसणे खूप धोकादायक आहे.’ त्याच वेळी, काही वापरकर्ते म्हणतात, ‘आता त्यांना समुद्राची शक्ती आता कळली असेल.’ दरम्या हा धडकी भरवणारा व्हिडीओ तुम्ही पाहा आणि आयुष्यात अशी चूक करु नका.
