• Sun. Dec 21st, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मारुती सुझुकीच्या कार झाल्या तब्बल 1.30 लाखांनी स्वस्त! नवीन किंमती जाहीर

ByEditor

Sep 18, 2025

नवी दिल्ली : जीएसटी दररचनेत झालेल्या बदलानंतर ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता कार आणि बाईक खरेदी करणे अधिक परवडणारे झाले असून, मारुती सुझुकीने त्यांच्या लोकप्रिय कारच्या सुधारित किंमती जाहीर केल्या आहेत.

३ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या ५६व्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवीन दररचना जाहीर केली. लहान श्रेणीतील कारसाठी मोठी सवलत देण्यात आली असून, याशिवाय मारुती सुझुकीने ग्राहकांसाठी अतिरिक्त डिस्काउंटचीही घोषणा केली आहे. परवडणाऱ्या कार उपलब्ध करून देणे आणि बाजारातील वाटा वाढवणे हा कंपनीचा उद्देश असल्याचे सांगितले गेले.

नवीन किंमती २२ सप्टेंबरपासून लागू होणार असून, डिसेंबर २०२५ पर्यंत प्रभावी राहतील.

मारुती सुझुकीच्या किंमतीत झालेली कपात आणि सुरुवातीच्या किमती
मॉडेल एक्स शोरुमच्या किंमतीत घटसुरुवातीची किंमत
S-PressoUp to 1,29,600 3,49,900
Alto K10 Up to 1,07,6003,69,900
CelerioUp to 6, 94,1004,69,900
Wagon-R Up to 79,6004,98,900
IgnisUp to 71,3005,35,100
Swift Up to 84,6005,78,900
BalenoUp to 86,1005,98,900
Dzire Up to 87,700 6,25,600
Fronx Up to 1,12,600 6,84,900
Brezza Up to 1,12,700 8,25,900
Grand Vitara Up to 1,07,00010,76,500
Jimny Up to 51,90012,31,500
Ertiga Up to 46,400 8,80,000
XL6 Up to 52,000 11,52,300
Invicto Up to 61,70024,97,400
Eeco Up to 68,0005,18,100

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!