• Sun. Dec 21st, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

CISF व आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट ‘Mpower’ यांच्यात मानसिक आरोग्य सेवांसाठी तीन वर्षांचा करार

ByEditor

Sep 16, 2025

नवी दिल्ली : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF) ने आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट (ABET) अंतर्गत असलेल्या मानसिक आरोग्य सेवांसाठी कार्यरत Mpower संस्थेशी सामंजस्य करार (MoU) केला आहे. या करारामुळे येत्या तीन वर्षांत CISF च्या सुमारे ७५ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक आरोग्यविषयक सेवा उपलब्ध होणार आहेत.

Mpower प्रकल्पांतर्गत देशातील २१ शहरांमध्ये समुपदेशन सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, ज्यामुळे CISF कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांना व्यापक प्रमाणात फायदा होणार आहे. सध्या २३ ठिकाणी Mpower कडून मनोवैज्ञानिक व समुपदेशकांच्या सेवांचा लाभ दिला जात आहे. आता या सेवांचा विस्तार करून समुपदेशकांची संख्या ३० केली जाणार असून पाटणा, अहमदाबाद, प्रयागराज, भोपाळ/इंदौर, जम्मू, चंदीगड, जयपूर आणि कोची यांसारख्या शहरांमध्येही या सुविधा उपलब्ध होतील.

या प्रकल्पाचे मुख्य लाभ :
  • मानसिक आरोग्यावर होणाऱ्या नकारात्मक परिणामांना आळा घालणे.
  • तणाव कमी करून कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करणे.
  • मानसिक आरोग्याविषयी जागरूकता वाढवणे.
  • संवादकौशल्य, निर्णयक्षमता व आत्मविश्वास वृद्धिंगत करणे.
  • नैराश्य, चिंता व इतर मानसिक समस्यांवर उपाय शोधण्यात मदत करणे.

या कराराबाबत CISF महानिदेशक राजेश्वर सिंह भाटी यांनी सांगितले की, “आमच्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी उत्तम वातावरण तयार ठेवणे ही प्राथमिकता आहे. ABET व Mpower यांच्या सातत्यपूर्ण सहकार्यामुळे आमच्या जवानांचे मानसिक आरोग्य मजबूत राहील आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या जबाबदाऱ्या ते अधिक उत्तमरीत्या पार पाडू शकतील.”

Mpower संस्थापिका व अध्यक्षा नीता बिर्ला यांनी यावेळी म्हटले की, “मानसिक आरोग्य ही काळाची गरज आहे. CISF सोबतचा हा करार म्हणजे सशस्त्र दलांच्या कुटुंबीयांसाठीही भावनिक व मानसिक आरोग्यसेवांचा विस्तार करण्यासाठीचे महत्त्वाचे पाऊल आहे.”

हा करार नोव्हेंबर २०२४ पासून अंमलात येईल आणि पुढील तीन वर्षाच्या काळात त्याचा CISF कर्मचाऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!