• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पूरग्रस्तांना मदत करताना हृदविकाराचा धक्का, उरणच्या पोलीस अधिकाऱ्याचा दुर्देवी मृत्यू

ByEditor

Jul 21, 2023

वार्ताहर
उरण :
राज्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या तर काही ठिकाणी पूरपरिस्थिती सारख्या घटना घडल्या आहेत. रायगडमधल्या खालापूर इथल्या इरसालावाडीत दरड कोसळून 21 जणांचा मृत्यू झालाय. यावेळी बचावकार्य सुरु असताना अग्निशमन दलाच्या एका जवानाचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. अशीच आणखी एक दुर्देवी घटना उरण भागात घडली आहे. उरण पोलीस स्टेशनला काम करणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याचाही मृत्यू झाला. एपीआय विशाल राजवाडे हे कर्तव्यावार असताना शहिद झाले. विशाल राजवाडे हे रात्रभर उरण भागातील चिरनेर भागात पुरग्रस्तांना मदत करत होते. चिरनेर भागात पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. स्वतः फिल्डवर उतरून विशाल राजवाडे हे पूरग्रस्तांना मदतीचा हात देत होते. त्याचवेळी त्यांना ह्दयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. विशाल राजवाडे यांच्या मृत्यूने पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलीस परिवार या संस्थेनं हा मुद्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे यांना फोन केला, विशाल राजवाडे यांचा कर्तव्यांवार असताना मृत्यू झाला आहे जेवढी शक्य असेल तेवढी मदत या कुटुंबियांना करा, तसेच अनुकंपतत्वावर कुटुंबियांतील व्यक्तीला घेण्यात येऊ शकतं का? यासाठी तपासणी करण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशाल राजवाडे यांच्या हळहळ व्यक्त केली. ही घटना वेदनादायी असल्याचं भावना व्यक्त केली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!