• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी पदी डॉ. बी. एन. बस्तेवाड

ByEditor

Jul 21, 2023

रायगड : डॉ. बी. एन. बस्तेवाड मुख्य महाव्यवस्थापक (L&S), एएसआरडीसी, मुंबई यांची रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप पार पडल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने प्रशासकीय पातळीवर भाकरी फिरवली आहे. त्यामध्ये राज्य सरकारने ४१ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. शिंदे-फडणवीस सरकारकडून संबंधित सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्याची यादी शुक्रवारी संध्याकाळी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये राज्यातील अनेक महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. एएसआरडीसीचे महाव्यवस्थापक (L&S) डॉ. बी. एन. बस्तेवाड यांची रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!