आदिती तटकरे यांचा 82798 मतांनी एकतर्फी विजय
अभय पाटील
बोर्ली पंचतन : 193 श्रीवर्धन विधानसभा मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आदिती सुनील तटकरे यांनी 82798 मतानी दणदणीत विजय संपादन केला असून अनिल नवगणे यांना 33252 इतकी मते मिळाली, श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात 2009 पासून सुरू असलेला तटकरे कुटुंबियांचा दबदबा पुन्हा सिद्ध केला.
सुनील तटकरे यांनी रायगडमध्ये श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात करिश्मा कायम राखत आपली कन्या व महिला व बालकल्याण विकास मंत्री व लाडकी बहीण योजनेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेल्या आदिती तटकरे यांना मोठया मताधिक्याने विजयी करण्यास यश आले आहे. आदिती तटकरर यांच्या विजयाने श्रीवर्धनमधील कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.
193 विधानसभा मतदार संघामध्ये उमेदवारांना मिळालेली मते खालीलप्रमाणे :-
आदिती तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस) :- 116050
अनिल नवगणे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार) :- 32252
अश्विनी साळवी :- 718
फैजल फोफेरे (म न से) :- 2125
अनंत गीते :- 373
अश्रफ पठाण :- 134
कृष्णा कोबनाक (बळीराज सेना) :- 490
मोहम्मद सोलकर :- 1589
युवराज भुजबळ :- 412
राजाभाऊ ठाकूर :- 4080
संतोष पवार :- 1341
नोटा:- 3375