• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई पश्चिम उपनगरांमध्ये कोणाची आघाडी; मतांच्या आकडेवारीसह मोठी अपडेट…पहा निकालाचे अपडेट

ByEditor

Nov 23, 2024

वरळी विधानसभा मतदारसंघातून मोठी बातमी 

सातव्या फेरीअखेर आदित्य ठाकरे 1067 मतांनी आघाडीवर

मुंबईतील आघाडी कोणाकडे?
भाजपा 16
शिवसेना शिंदे 7
राष्ट्रवादी अजित पवार 0
काँग्रेस 2
शिवसेना युबिटी 9
राष्ट्रवादी शरद पवार 0
मनसे 0
सपा 2

महायुती 23
मविआ 13

मिहीर कोटेचा मोठ्या मताधिक्याने आघाडीवर

मलबार हिलमधून मंगलप्रभात लोढा आघाडीवर
मतमोजणीच्या आठव्या फेरीनंतर मलबार हिल मतदारसंघातून मंगलप्रभात लोढा आघाडीवर. या जागेवर भाजपकडे 2,2701 मतांची आघाडी.

कुर्ला विधानसभेतील तिसऱ्या फेरीनंतरची आकडेवारी
मंगेश कुडाळकर ( शिंदे शिवसेना ): 14535
प्रविणा मोरजकर ( ठाकरे शिवसेना ) : 7023
स्वप्नील जवळघेकर ( VBA ) : 508
प्रदीप सावंत ( मनसे ) : 581
नोटा : 367

7512 मतांनी शिंदे यांच्या शिवसेनेचे मंगेश कुडाळकर आघाडीवर

कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतमोजणी पाचवी फेरी
एकनाथ शिंदे – 5606
केदार दिघे – 1807
मतांचा फरक – 3799
नोटा – 115

भांडुप पश्चिम तिसरी फेरी, रमेश कोरगावकर आघाडीवर
रमेश कोरगावकर -12472
अशोक पाटील -10170
शिरीष सावंत -1858

माहिम मतदारसंघातील दुसऱ्या फेरीनंतरची आकडेवारी
महेश सावंत 1657 मतांनी आघाडीवर

महेश सावंत 5692
सदा सर्वणकर 4035
अमित ठाकरे 3449

महाड विधानसभा : आठव्या फेरी अखेर शिवसेना शिंदे गटाचे भरत गोगावले 11838 मतांनी आघाडीवर

विधानसभा निवडणुकांचे पहिले कल समोर आले आहेत. महायुतीने 204 जागांवर आघाडी घेतली आहे. तर, मविआ 49 जागांवर आघाडी घेतली आहे,

भाजप- 111
शिवसेना (शिंदे)- 58
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार पक्ष)- 35
काँग्रेस- 20
शिवसेना (उद्धव ठाकरे)- 18
राष्ट्रवादी काँग्रेस (SP)- 9
इतर-16

कर्जत विधानसभा : सहाव्या फेरी अखेर शिवसेना शिंदे गटाचे महेंद्र थोरवे ७४५ मतांनी आघाडीवर

बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार 15245 मतांनी आघाडीवर आहेत. 

अजित पवार 35,329 
युगेंद्र पवार 20,084

 राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरोज अहिर पुन्हा आघाडीवर

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या सरोज अहिरे यांची तिसऱ्या फेरी अखेर मोठी आघाडी. तर, शिंदे आणि ठाकरे पक्षाचे उमेदवार पिछाडीवर. 11,326 मतांनी सरोज अहिरे आघाडीवर

सरोज अहिरे – 17562
राजश्री आहेरराव – 6236
योगेश घोलप -4159

छगन भुजबळ पुन्हा आघाडीवर

येवल्यात चौथ्या फेरीत छगन भुजबळांची 3,000 मतांची आघाडी. सुरुवातीच्या पिछाडीनंतर भुजबळ आघाडीवर तर शरद पवार पक्षाचे माणिकराव शिंदे पिछाडीवर 

यशोमती ठाकूर यांना मोठा धक्का
भाजप उमेदवार राजेश वानखेड 630 मतांनी आघाडीवर. यशोमती ठाकूर 630 मतांनी पिछाडीवर

पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर, कसबा या चार मतदारसंघात महायुती आघाडीवर

हडपसर मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे चेतन तुपे आघाडीवर

वडगाव शेरीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे आघाडीवर

पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये मात्र काँग्रेसचे रमेश बागवे आघाडीवर

खडकवासल्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सचिन दोडके आघाडीवर

Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील चौथ्या फेरी अखेर 9076 मतांनी आघाडीवर

हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभा मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संतोष बांगर तिसऱ्या फेरी अखेर 5 हजार 580 मतांनी आघाडीवर

बाळासाहेब थोरात तिसऱ्या फेरीनंतर 6 हजार मतांनी पिछाडीवर
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात तिसऱ्या फेरी नंतर 6 हजार मतांनी पिछाडीवर. महायुतीचे अमोल खताळ तिसऱ्या फेरीत आघाडीवर

रोहित पवार पिछाडीवर
कर्जत जामखेड मतदारसंघात दुसऱ्या फेरी अखेर भाजपचे राम शिंदे 634 मतांनी आघाडीवर आहेत. तर, राष्ट्रवादी SP रोहित पवार पिछाडीवर

लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख पिछाडीवर
लातूर ग्रामीण मतदारसंघातून तिसऱ्या फेरीत काँग्रेसचे उमेदवार धीरज देशमुख पिछाडीवर आहेत. भाजपा उमेदवार रमेश कराड 264 मतांनी आघाडीवर आहेत. लातूर ग्रामीण मतदारसंघात काँग्रेसचे आमदार धिरज देशमुख विरुद्ध विधान परिषदेचे आमदार रमेश कराड अशी आमदार विरुद्ध आमदार अशी लढत झाली होती

शिवसेनेचे संजय राठोड आघाडीवर
दिग्रस मतदारसंघात तिसऱ्या फेरीत शिवसेनेचे संजय राठोड 1075 मतांनी आघाडीवर

हर्षवर्धन पाटील आघाडीवर, दत्ता भरणे पिछाडीवर
निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधून फोडून इंदापुरातून शरद पवारांनी रिंगणात उतरवलेले हर्षवर्धन पाटील आघाडीवर आहेत. तर अजित पवारांचे उमेदवार दत्ता भरणे मागे पडले आहेत.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रोहित पाटील आघाडीवर
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रोहित पाटील दुसऱ्या फेरी अखेरी 2,254 मतांनी आघाडीवर. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संजयकाका पाटील पिछाडीवर

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात पहिल्या फेरी नंतर 1275 मतांनी पिछाडीवर. महायुतीचे अमोल खताळ पहिल्या फेरीत आघाडीवर

दुसऱ्या फेरी अखेर इगतपुरी मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार हिरामण खोसकर 8 हजार मतांनी आघाडीवर

अब्दूल सत्तार पिछाडीवर
सिल्लोड मतदारसंघातून उद्धव ठाकरे पक्षाचे सुरेश बनकर 2 हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर अब्दुल्ल सत्तार पिछाडीवर आहेत.

रत्नागिरी तिसऱ्या फेरीनंतर उदय सामंत 6080 मतांनी आघाडीवर

आमदार रवी राणा पहिल्या फेरीत 685 मतांनी आघाडीवर
बडनेरा मतदार संघाची पहिली फेरी पूर्ण झाली आहे. आमदार रवी राणा पहिल्या फेरीत 685 मतांनी आघाडीवर आहेत. ठाकरे गटाच्या बंडखोर प्रीती बंड आणि रवी राणा यांच्या चुरशीची लढत

गुलाबराव पाटील आघाडीवर
जळगाव ग्रामीण मतदार संघात शिवसेना शिंदे पक्षाचे गुलाबराव पाटील आघाडीवर. गुलाबराव पाटील आघाडीवर असल्याने गुलाबराव पाटलांच्या पाळधी गावात झळकले अभिनंदनचे बॅनर

कुडाळमधून निलेश राणे आघाडीवर
कुडाळ मतदारसंघातून शिवसेनेचे निलेश राणे आघाडीवर आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!