अनंत नारंगीकर
उरण : उरण विधानसभा मतदारसंघात दुसऱ्यांदा निवडून आलेले महेश बालदी व पनवेल विधानसभा मतदारसंघात सलग चौथ्यांदा निवडून आलेले प्रशांत ठाकूर यांचा विजय हा कार्यकर्त्यांच्या एक संघेचा व दोन्ही आमदारांनी मतदारसंघात केलेल्या विकास कामांचा विजय असल्याचे मत भाजपचे युवा नेतूत्व समिर शेठ मढवी यांनी व्यक्त केले.
उरण व पनवेल या दोन्ही मतदारसंघांतील भाजपाचे आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी जन माणसांचे प्रश्न सोडविण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी खासदार तथा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने प्रयत्न केले.अशा जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने प्रयत्नशील असणाऱ्या दोन्ही आमदारांना २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत विजयी करण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी जी अथकपणे मेहनत घेतली आणि जनतेने दोन्ही आमदारांच्या बाजूनी उभे राहण्याचा निर्णय घेतला त्यामुळे उरण व पनवेल विधानसभा मतदारसंघात घवघवीत यश मिळाल्याचे मत भाजपचे युवा नेतूत्व समिर शेठ मढवी यांनी सांगितले.