• Mon. Dec 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

अलिबाग-रेवदंडा मार्गावर अपघात; गाडी थेट घरात

ByEditor

Jul 22, 2023

अमूलकुमार जैन
अलिबाग :
तालुक्यातील रेवदंडा-अलिबाग मार्गावर नागाव कडून अलिबागकडे जाणाऱ्या पांढऱ्या रंगाची स्विफ्ट गाडीचा अपघात झाल्याची घटना घडलेली आहे. गाडी रायवाडी वळणावर येताच चालकाचा गाडीवरील ताबा सुटून थेट घरात घुसली.

बुधवारी रात्री 12वा.च्या सुमारास पांढऱ्या रंगाची स्विफ्ट (एमएच-14-केओ-3214) गाडी रायवाडीच्या वळणाजवळ येताच रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या घरामध्ये घुसली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु, घरासोबतच गाडीचेही मोठे नुकसान झालेले आहे. चालक मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याचे निदर्शनास आले. अपघात होताच चालकासह तिघांनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता स्थानिकांनी त्यांना शोधून अलिबाग पोलिसांच्या ताब्यात केले आहे. गाडीचा अपघात होण्याआधी दोन दुचाकी चालकांना उडवल्याचेही समजते.

गाडीचा वेग इतका होता की, गाडी रस्त्याच्या विरुद्ध बाजूला एक-दोन फूट वर असलेल्या घरात घुसली व तिचे दोन्ही पुढचे टायर पंक्चर झाले. जर ते घर रस्त्यालगत समान खाली असते तर गाडी संपूर्ण घरात घुसून जीवितहानी झाली असती, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!