• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगडमध्ये 54 उमेदवारांचे डिपॉझिट झाले जप्त

ByEditor

Nov 26, 2024

प्रतिनिधी
अलिबाग :
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्हयातील 54 उमेदवारांची डिपॉझीट जप्त झालीय. मतांचा अपेक्षित कोटा पूर्ण न केल्याने 54 जणांवर डिपॉझीट जप्त करण्याची वेळ आलीय. यामध्ये मनसे, बहुजन समाज पार्टी, वंचित आघाडी आणि अनेक अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.

रायगड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान झाले. यामध्ये सात मतदार संघातून 73 उमेदवार आपले राजकीय भवितव्य अजमावित होते. यामध्ये 111 उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले होते. यामध्ये पनवेल 23, कर्जत 13, उरण 16, पेण 15. अलिबाग 23, श्रीवर्धन 13 आणि महाडमध्ये 8 उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले. यामधून 38 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. यामध्ये पनवेल 10, कर्जत 4, उरण 2, पेण 8, अलिबाग 9, श्रीवर्धन 2, आणि महाडमधील 3 उमेदवारांनी माघार घेतली. सात मतदार संघात एकूण 73 जण रिंगणात उरले होते. यामध्ये पनवेल 13, कर्जत 9, उरण 14. पेण, अलिबाग 14, श्रीवर्धन 11 महाड 5 उमेदवारांचा समावेश होता. यामधून एकूण 19 उमेदवारांचे अनामत रक्कम वाचली आहे. यामध्ये मतदारसंघातून विजयी झालेल्या आ.प्रशांत ठाकूर (पनवेल), महेंद्र थोरवे (कर्जत), रवी पाटील(पेण), महेश बालदी (उरण), अलिबाग (महेंद्र दळवी), आदिती तटकरे (श्रीवर्धन), भरत गोगावले (महाड) यांच्यासह अन्य पक्षांचे प्रमुख पराभूत उमेदवार बाळाराम पाटील, लीना गरड (पनवेल), सुधाकर घारे, नितीन सावंत (कर्जत), प्रीतम म्हात्रे, मनोहर भोईर (उरण), प्रसाद भोईर, अतुल म्हात्रे (पेण), चित्रलेखा पाटील, दिलीप भोईर ( अलिबाग),अनिल नवगणे( श्रीवर्धन), स्नेहल जगताप (महाड) या उमेदवारांचा समावेश आहे. तर श्रीवर्धनमधून निवडणूक लढविणारे काँग्रेसचे बंडखोर राजेंद्र ठाकूर, मनसेचे फैजल पोपेरे, बसपचे अश्विनी साळवी यांच्यासह चार अपक्षांची अनामत जप्त झालेली आहे. महाडमध्ये 3, पनवेल 10, श्रीवर्धन 9, उरण 11, कर्जत 6, पेण 4, अलिबाग 11 अशा उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झालेली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!