• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

आचार संहिता संपली मात्र झाकलेल्या क्रांती ज्योतीचा माथेरान नगरपालिका प्रशासनाला विसर

ByEditor

Nov 27, 2024

गणेश पवार
कर्जत :
राज्यात निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर संबंधित राज्यात आचारसंहिताही लागू झाली आहे. मात्र पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीचे मतदान प्रकिया व मतमोजणी होऊन निकाल जाहिर झाले असताना, १८९- कर्जत विधानसभा मतदार संघात येणाऱ्या माथेरान गिरिस्थान नगरपरिषद प्रशासनाकडून आचारसंहितेमध्ये हुतात्म्यांची असलेली क्रांती ज्योतही झाकण्यात आलेली. ती खुली करण्याचा मात्र विसर पडल्याचा प्रकार समोर आला असुन, माथेरान गिरिस्थान नगरपरिषद प्रशासनाला हुतात्मांच्या क्रांती मशालीचा विसर पडल्या बद्दल प्रशासनाच्या बेजबाबदारपणाच्या विरोधात माथेरानकरांकडून नाराजी व निषेध व्यक्त केला जात आहे.

१८९ – कर्जत विधानसभा मतदार संघात निवडणूकी दरम्यान महाविकास आघाडीचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उमेदवार हा रिंगणात असल्याने व त्या उमेदवाराची निशाणी ही मशाल असल्याने, केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लावण्यात आलेल्या आचारसंहितानुसार माथेरानमध्ये हुतात्मा भाई कोतवाल व हिराजी गोमाजी पाटील यांचे असलेल्या हुतात्मा स्मारकाजवळ असलेली क्रांती ज्योत ही माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेकडून झाकण्यात आली होती. तर माथेरान हे हुतात्मा भाई कोतवाल यांचे जन्मस्थान असल्याने व मानिवली हे हुतात्मा हिराजी पाटील यांचे गाव असल्याने व हुतात्मा भाई कोतवाल, हुतात्मा हिराजी पाटील यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणांची आहुती दिली असल्याने त्यांच्या कार्याप्रती लोकांच्या मनात मोठया प्रमाणात श्रद्धेचे स्थान असल्याने, निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आचारसंहितेच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असते. त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची तारीख जाहीर होताच राज्यात आचारसंहिता लागू झाली व तीची मुदत ही मतमोजणीपर्यंत सुरू राहते असे असताना, राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीची मतदान प्रक्रिया तसेच मतदान मोजणी प्रक्रिया पार पडली, निकाल घोषीत झाले. राज्यात सरकार स्थापनेच्या प्रक्रियेला सुरवात झाली मात्र माथेरान गिरिस्थान नगरपरिषद प्रशासनाला देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या हुतात्मा भाई कोतवाल, हुतात्मा हिराजी पाटील यांच्या स्मारकात असलेली क्रांती ज्योत खुली करण्याचा विसर पडला असल्याने, माथेरानकरांकडून माथेरान गिरिस्थान नगरपरिषद प्रशासनाच्या बेजबाबदारपणाच्या विरोधात माथेरानकरांकडून नाराजी व निषेध व्यक्त केला जात आहे.

कर्जत तालुक्यातील हुतात्मा भाई कोतवाल, हुतात्मा हिराजी पाटील यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणांची आहुती दिली. माथेरान हे हुतात्मा भाई कोतवाल यांचे जन्म स्थान असताना व त्यांच्या जन्मस्थान असलेल्या माथेरानमध्ये हुतात्मा भाई कोतवाल, हुतात्मा हिराजी पाटील यांच्या असलेल्या स्मारकात असलेली क्रांती ज्योत ही आचारसंहिता संपली असताना, खुली करण्याचा विसर हा माथेरान गिरिस्थान नगरपरिषद प्रशासनाला पडला असल्याने या प्रशासनाला देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या हुतात्मा भाई कोतवाल, हुतात्मा हिराजी पाटील यांच्या हौतात्म्याचा काही एक पडले नसल्याचे व त्यांचा बेजबाबदारपणा समोर येत असल्याने अशा प्रशासनाचा आम्ही माथेरानकर म्हणून निषेध व्यक्त करीत आहोत.
-सुभाष भोसले,
उपाध्यक्ष, माथेरान शहर भाजपा

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!