• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात भारतीय संविधान दिनी उद्देशिकेचे वाचन

ByEditor

Nov 27, 2024

प्रतिनिधी
नागोठणे :
येथील को. ए. सो. आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात संविधान दिनानिमित्त सामुहिक संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला २६/११ या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. दिनेश भगत यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन केले. डॉ. दिनेश भगत यांनी या प्रसंगी विद्यार्थ्यांना संविधान बद्दलची सखोल माहिती दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. श्रीकृष्ण तुपारे यांनी केले. या प्रसंगी सर्वांनी सामुहिक संविधान उद्देशिकेचे वाचन केले.

या कार्यक्रमासाठी वनस्पती विभाग प्रमुख प्रा. डॉ. विजय चव्हाण, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. जयेश पाटील, कार्यक्रम अधिकारी डॉ. मनोहर शिरसाठ, महिला विकास कक्ष प्रमुख डॉ. स्मिता चौधरी, निरंतर शिक्षण विभाग प्रमुख डॉ. राणी ठाकरे, प्रा. हेमंत जाधव, डॉ. विकास शिंदे, प्रा. निलम महाले यांच्यासह इतर शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!