• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

किहीम येथे संविधान दिन उत्साहात साजरा

ByEditor

Nov 27, 2024

अब्दुल सोगावकर
सोगाव :
अलिबाग तालुक्यातील किहीम येथील ग्रामपंचायत कार्यालयात २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिनास ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मंगळवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता संविधान अमृतमहोत्सव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी ग्रुप ग्रामपंचायत किहीम कार्यालयात भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांनी व उपस्थित सर्वांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करण्यात आले, तसेच यावेळी उपस्थित सर्वांनी संविधान दिनी संविधानाप्रती सामूहिक शपथ घेतली. या कार्यक्रमास ग्रुप ग्रामपंचायत किहीम सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या सुधीर गायकवाड तसेच ग्रामपंचायत सदस्या जान्हवी वाघे, निधी काठे, स्नेहा आर्ते, बचत गट महासंघाच्या अध्यक्षा गायत्री गणेश भोईर व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!