अब्दुल सोगावकर
सोगाव : उत्पत्ती एकादशीनिमित्त अलिबाग तालुक्यातील किहीम येथे मंगळवार दि. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी स. म. वडके चोंढी – किहीम शाळेच्या विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग यांचा दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

यावेळी स. म. वडके चोंढी किहीम – शाळेच्या विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग यांच्यावतीने उत्पत्ती एकादशी निमित्ताने काढण्यात आलेली दिंडी किहीम हद्दीतील श्रीनगर येथील श्री. गणेश मंदिर येथे आला असता उपस्थित सर्वांनी स्वागत करत दर्शन घेतले, तसेच दिंडी सोहळ्यात सहभागी विद्यार्थी व शिक्षकांना ग्रुप ग्रामपंचायत किहीम सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य, सदस्या यांच्यातर्फे अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. या निघालेल्या दिंडी सोहळ्याचे ग्रामपंचायत हद्दीत ग्रामस्थांकडून ठिकठिकाणी स्वागत करत दर्शन घेण्यात आले. या कार्यक्रमास ग्रुप ग्रामपंचायत किहीम सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड, उपसरपंच मिलिंद पडवळ, ग्रामपंचायत सदस्य साईल पाटील, संतोष किर, सदस्या जान्हवी वाघे, निधी काठे, स्नेहा आर्ते व ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग तसेच किहीम ग्रामपंचायत हद्दीतील महिला व पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.