• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

सोलनपाडा पाझर तलावाला गळती; ग्रामस्थ भयभीत, अधिकारी वर्गाची धावपळ

ByEditor

Jul 22, 2023

गणेश पवार
कर्जत :
तालुक्यातील सोनलपाडा पाझर तलावाच्या गळतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे सोलनपाड्यातील नागरिक भयभीत झाले असून दिवस-रात्र जीव मुठीत घेऊन दिवस काढावे लागत आहेत असे स्थानिक नागरिक सांगत आहेत.

सोलनपाडा हा पाझर तलाव पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. येथे शनिवार, रविवारी खूप मोठी गर्दी उसळते. त्यामुळे या तलावाच्या गळतीत वाढ झाल्यामुळे येथील स्थानिक नागरिक भयभीत झाले आहेत. सोनलपाडा डॅम धोकादाय झाल्याचे स्थानिकांमध्ये बोलले जात आहे.

स्थानिक पुढाऱ्यांनी गावातील सर्व कुटुंबाना सुरक्षिततेच्या कारणास्तव विजयभूमी कॉलेजमध्ये स्थलांतरित केले आहे तसेच कर्जत तहसीलदार व अधिकाऱ्यांनी धावपळीत सर्व पाझर तलावची पाहणी केली. हा डॅम सुरक्षित आहे असे प्रशासनाच्यावतीने बोलले जात आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!