• Thu. Apr 17th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

विद्यार्थ्यांनी आता अभ्यासात मेहनत घेतली तर आयुष्य सुंदर होईल -सुमित उरकुडकर

ByEditor

Nov 30, 2024

अदानी फाऊंडेशनतर्फे बोर्ली पंचतन येथे करिअर समुपदेशन व मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

अभय पाटील
बोर्ली पंचतन :
विद्यार्थ्यांनो स्वतःला ओळखून आपलं करियर निवडावं, आता मजा केलात तर नंतर आयुष्यभर मेहनत करावी लागेल उलट आता जर अभ्यासात मेहनत घेतली तर नंतर चे आयुष्य सुंदर बनू शकेल असे प्रेरक वक्तव्य समुपदेशक सुमित उरकुडकर यांनी केले बोर्ली पंचतन येथील आयोजित विद्यार्थी करियर मार्गदर्शन शिबिरात केले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या करिअर विकासासाठी अदानी फाऊंडेशन दिघी पोर्ट लिमिटेडतर्फे श्री मोहनलाल सोनी विद्यालय व श्री नानासाहेब कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, बोर्ली पंचतन, ता.श्रीवर्धन येथील १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर समुपदेशन व मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जनता शिक्षण संस्था विश्वस्त अध्यक्ष रवींद्र कुळकर्णी, संचालक समिती उपाध्यक्षा शीतल तोडणकर, सचिव अनंत भायदे, संचालक कुमार गाणेकर, श्रीकांत तोडणकर, प्राचार्य बाबासाहेब यळमंते, अदानी फाऊंडेशनचे जयश्री काळे आणि अवधूत पाटील तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे असलेल्या अपार प्रतिभेला योग्य दिशा देण्याचा उद्देश या उपक्रमामागे होता. या कार्यशाळेत प्रमुख प्रेरक वक्ते सुमित उरकुडकर यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, स्वकर्तृत्व, औद्योगिक संधी, नागरी सेवा परीक्षा, तसेच उद्योग व्यवसाय उभारणीसाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. करिअर निवडताना योग्य विचार व चर्चेची प्रक्रिया कशी महत्त्वाची आहे, याबाबत त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.तसेच आपण विद्यार्थी दशेत उत्तम मेहनत घेतली तर तुम्ही यशस्वी व्हाल, आता मेहनत घेतली नाही तर भविष्यात खूप मेहनत घ्यावी लागेल, पण अति आणि अति मेहनत नसावी ज्यांनी आताच शरीराला त्रास होईल.

कार्यक्रमात २०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअर निवडीसाठी उपयुक्त माहिती मिळाली. समारोपाच्या वेळी जनता शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा शीतल तोडणकर यांनी अदाणी फाऊंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक केले व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी फाऊंडेशनने घेतलेल्या पुढाकाराबद्दल आनंद व्यक्त केला. शाळेचे प्राचार्य बाबासाहेब यळमंते यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल अदानी फाऊंडेशनचे आभार मानले. संचालन प्राध्यापिका अंजना पाटील व टी. बी. हुलगे यांनी केले तर आभारप्रदर्शन प्राध्यापक प्रवीणकुमार पवार यांनी व्यक्त केले.

अदानी फाऊंडेशन ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी नवी दिशा आणि प्रेरणा देण्याचे कार्य करीत असून या कार्यशाळेतील मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास उंचावला असून त्यांना विविध करिअर संधींबाबत माहिती मिळाली. अशा प्रकारचे उपक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व वैयक्तिक प्रगतीसाठी उपयुक्त ठरतील, अशी अपेक्षा पालकवर्गातून व्यक्त होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!