सलीम शेख
माणगाव : ऋतूमानानुसार पीक घेण्याची परंपरा असलेल्या रायगड जिल्ह्यात विविध हंगामात वेगवेगळी पिकं घेतली जातात.पावसाळा ,हिवाळा व उन्हाळ्यातील विविध पिकासाठी रायगड प्रसिद्ध आहे.
जून ते सप्टेंबर महिन्यात भाताचे पीक ,हिवाळ्यात विविध कडधान्य पीक तर हिवाळा- उन्हाळ्यात विविध भाजीपाला व कलिंगड आदी पिकं जिल्ह्यात घेतली जातात.गेले कित्येक वर्षे हे चक्र सुरू आहे.जूनला सुरू झालेला पावसाळा सप्टेंबर अखेर परतीला लागतो व ऑक्टोबर महिन्यात हिवाळी शेतीची कामे सुरू होतात.या वर्षी मात्र लांबलेल्या पावसाने उघडीप दिली नव्हती,सतत पाऊस पडल्याने शेतकऱ्यांची कापणी सह सर्वच कामे रखडली होती. मात्र नोव्हेंबर महिन्यात उघडीप दिलेल्या पावसाने कडधान्ये शेती लागवड करण्यात आली आहे. थंडी, योग्य हवामान यामुळे पेरणी झालेली कडधान्ये चांगली उगवून आली असुन कडधान्ये शेती बहरत आहे.
ऑक्टोबर महिन्यात कडधान्ये शेतीची लागवड केली जाते. काही शेतकरी भात कापणीपूर्वी वाळ, मटकी इत्यादी कडधान्य शेतात पेरतात. हिवाळी पिकांसाठी आवश्यक असलेले वातावरण मिळाल्यास या पिकांवर लक्ष ठेऊन असलेल्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होतो. त्यामुळे कडधान्य शेती बहरत असल्याने शेतकऱ्यांनी आनंदा व्यक्त केला आहे.
ऑक्टोबर महिन्यात कापणी पूर्वी कडधान्ये पिकांची पेरणी करतो. योग्य ओलाव्यामुळे ही पिके बहरात येत आहेत.असेच वातावरण राहिल्यास कडधान्ये चांगली होतील.
-मंजुळा पडवळ, शेतकरी.