प्रतिनिधी
महाड : अंबुजा फाउंडेशन व इंडसइंड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने एकात्मिक जलस्रोत व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत महाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी आदर्श गाव राळेगणसिद्धीस दि. २९ नोव्हेंबर २०२४ रोजी भेट दिली. या अभ्यास दौऱ्यासाठी १३ ग्रामपंचायतीमधील 34 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला.

या भेटीदरम्यान समृद्ध गाव, जल व्यवस्थापन, महिला सक्षमीकरण ,शेती या विषयावर मार्गदर्शन मिळाले. या भेटीदरम्यान थोर समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रत्यक्ष भेट झाली. यावेळी शेतकऱ्यांनी आण्णांशी संवाद साधला. सदर भेटीदरम्यान अण्णा हजारे यांनी अंबुजा फाउंडेशन आणि इंडस्इंड बँक यांच्या एकात्मिक जलस्रोत व्यवस्थापन प्रकल्पाच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. सदर अभ्यास दौरा यशस्वी करण्यासाठी प्रोजेक्ट एक्झिक्यूटिव्ह श्रीधर मुरगुडे, सागर इंगळे, प्रक्षेत्र अधिकारी भक्ती पवार व निकिता मांडे यांनी काम पाहिले.