सलीम शेख
माणगाव : येथील एस. एस. निकम इंग्लिश स्कूलची इयत्ता सहावीतील विद्यार्थीनी कु. कनिष्का संतोष शिंदे ही अखिल भारतीय राजभाषा हिंदी उतमा परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याने तिचे सर्व स्तरांतून अभिनंदन व कौतुक होत आहे.
कु. कनिष्का शिंदे ही लहानपणापासूनच बुद्धीने अत्यंत तल्लख असुन शाळेतील विविध स्पर्धांमध्ये ती नेहमीच सहभाग घेत असते. आई-वडीलांचे तसेच शाळेतील शिक्षक वर्ग तिला प्रोत्साहीत करीत असतात. तिने प्राप्त केलेल्या या यशाबद्दल तिला अनेकांनी पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.