• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरणच्या ११ वर्षीय मयंक म्हात्रेने पुन्हा एकदा रचला इतिहास

ByEditor

Dec 3, 2024

खेळाडूंसाठी मैदान उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा करणार- प्रितम म्हात्रे

घन:श्याम कडू
उरण :
करंजा येथील जलतरणपटू मयंक म्हात्रे याने घारापुरी बंदर ते करंजा जेट्टी हे सागारी १८ किमी अंतर निर्धारीत वेळेपेक्षा कमी वेळेत पोहून पार करत, पुन्हा एकदा नवा इतिहास घडविला आहे. मयंकने ३ डिसेंबर रोजी धरमतर ते करंजा हा प्रवाह पोहून पार केला होता. ज्यामुळे तो हा प्रवाह पोहून जाणारा पहिला जलतरणपटू ठरला होता. तर यावेळी घारापुरी ते करंजा जेट्टी हा प्रवाह पोहून जाणारा मयंक पहिला जलतरणपटू ठरला असून, त्याने या निमित्ताने नवा इतिहास रचला असल्याचे त्याच्या प्रशिक्षकांकडून सांगण्यात येतं आहे. या यशाबद्दल मयंक म्हात्रे याचा सत्कार करताना उरणकरांना भेडसावणारी मैदानाची गैरसोय लक्षात घेता ती पूर्ण होण्यासाठी आपण पाठपुरावा करून तो नक्कीच मार्गी लावू असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

उरणच्या सेंट मेरीज कॉन्व्हेट शाळेतील सहाव्या इयत्तेत शिकणारा मयंक हा उत्कृष्ट जळतरणपटू असून, समुद्रीय जलतरण हा त्याचा आवडता प्रकार आहे. मयंकने आजवर अनेक स्पर्धानमधून यश संपदान केले आहे. मात्र समुद्रीय जलतरण हे त्याला मोठे यश आणि प्रसिद्धी देणारे ठरले आहे. समुद्र किनारी लागून असणाऱ्या करंजा, कोंढारीपाडा येथे राहणाऱ्या या ११ वर्षीय चिमुकल्याने आज नवा विक्रम केला आहे. मंगळवार, दि. ३ डिसेंबरच्या मध्यरात्री १:०४ मिनिटांनी मयंकने जगविख्यात घारापुरी बंदर येथून समुद्राच्या लाटांना आव्हान देत करंजा जेट्टी गाठली आणि पुन्हा एकदा नवा विक्रम प्रस्थापित केला. सागरी १८ किमी अंतर त्याने निर्धारीत वेळेपेक्षा अर्धातास आधी पोहून पूर्ण केले आहे. हा प्रवाह पोहून जाण्यासाठी ६ तासाचा अवधी अपेक्षित होता. तर मयंकने हे अंतर ५ तास २९ मिनिटात पोहून पार करत सर्वांनाच चकित केले आहे.

त्याने केलेल्या या प्रयत्नाने घारापुरी ते करंजा हा प्रवाह पोहून पार करणारा तो पहिला जलतरणपटू ठरला आहे. याच प्रमाणे मागील वर्षी याच दिवशी म्हणजे ३ डिसेंबर २०२४ रोजी त्याने धरमतर ते करंजा हे १८ किमी अंतर पोहून पार करत तो प्रवाह पोहून पार करणारा पहिला जलतरणपटू म्हणून आपले नावं कोरले आहे. त्यामुळे रायगड, मुंबई विभागातील समुद्रीय जलप्रवाहातील दोन पप्रवाहांवर मयंकने आपले नावं कायमस्वरूपी कोरले आहे.

मयंकने केलेल्या विक्रमनंतर अनेकांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. तर यावेळी मयंकचा सत्कार शेकापचे युवा नेतृत्व प्रीतमदादा म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष राजू कोळी, संघटनेचे निरीक्षक शैलेश सिंग, समाजसेवक सचिन डाऊर, नितीनभाऊ कोळी, एल. बी. पाटील सर, सीमा घरत यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती यावेळी लाभली होती.

मयंकने आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय आपले आई वाडील, मार्गदर्शक किशोर पाटील, प्रशिक्षक हितेश भोईर यांना दिले आहे. तर उरण तालुका हौशी जलतरण संघटनेचे सचिव सुनील पाटील, मनोहर टेमकर, जलतरणपटू जयदीप सिंग, आर्यन मोडखरकर, वेदांत पाटील, रुद्राक्षी टेमकर, आर्य पाटील यांचे सहकार्य त्याच्या या विक्रमादरम्यान मयंकला लाभले.

मयंकच्या या यशाबद्दल शेकापचे युवानेते प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते ट्रॉफी, शाल व गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अनेकांनी उरणकरांसाठी खेळाचे मैदान नसल्याची खंत व्यक्त केली होती. त्यानुसार आपण उरणकरांसाठी हक्काचे खेळाचे मैदान मिळावे यासाठी पाठपुरावा करून तो नक्कीच मार्गी लावू असा विश्वास व्यक्त करून मयंक म्हात्रे याचे अभिनंदन करून यापुढे कोणत्याही क्षेत्रातील खेळाडूने उरणचे नाव उज्जवल करण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी आपणही पुढाकार घेऊ असे सांगितले. यावेळी मयंक म्हात्रे याच्या यशाबद्दल त्याचे अनेकांनी सत्कार व अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!