• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माणगावात रेल्वेची धडक लागून अनोळखी इसमाचा मृत्यू

ByEditor

Dec 3, 2024

सलीम शेख
माणगाव :
माणगाव येथे तेजस एक्सप्रेस रेल्वेची धडक लागून अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी ९ वा. च्या सुमारास कोकण रेल्वे मार्गावरील स्टोन क्र. ३१/१ ते ३१/२ मध्ये डाऊन मार्गावर रेल्वे रुळावरती प्लास्टिक बाटल्या उचलत असताना तेजस एक्सप्रेस ट्रेन क्र. २२११९ ची अनोळखी इसमास ठोकर लागून मयत याच्या डोक्यास तसेच दोन्ही हातापायाला, शरीराला गंभीर दुखापत होऊन शरीराचे तुकडे झाले. या अपघाताची नोंद माणगांव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पो. नि. निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. स. ई. राठोड करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!