सलीम शेख
माणगाव : तालुक्यात चोरांनी पुन्हा एकदा उच्छाद मांडला आहे. यामध्ये माणगाव शहरातील सुशिक्षित लोकांची सोसायटी समजल्या जाणाऱ्या माणगाव पुणे म्हणजेच दिघी पुणे हायवेवर असलेल्या “अमित कॉम्प्लेस “वसाहतीत चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढत सुमारे ५ लाखाचा मुद्देमाल लंपास केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या घटनेत माणगाव अमित कॉम्प्लेक्समधील सुमारे ३ फ्लॅट व एक बंगलो या चोरट्यानि फोडला आहे. त्यामध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधताना अमित कॉम्प्लेक्स च्या बी विंग मधील रहिवाशी ज्योती शंकर यांच्या घरातील ३ लाख किंमतीचे सोने चांदीचे दागिने ८० हजार रोख रक्कम चोरीला गेली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच त्यांच्या समोर राहणारे हे शासकीय कर्मचारी असून व ते बॅचलर असल्याने त्यांनी आपल्या घरातून काय गेले ? हे सांगणे टाळले आहे. मात्र हा जबरी चोरी दरोडा माणगांव मधील अमित कॉम्प्लेक्स मध्ये पडला आहे. आणि लाखोंचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी बंद दरवाज्यांचे कडी कोयांडा तोडून लंपास केला आहे. अशी माहिती समोर यामध्ये प्रसिद्धी माध्यमासमोर अनेक सीसी टीव्ही फुटेज व व्हिडीओ समोर आले आहेत.
यामुळे माणगावकर थंडीमध्ये सुस्त आहेत का? सुरक्षा यंत्रणा सुस्त आणि चोरट्यांचा धुमाकूळ मस्त..! अशी परिस्थिती माणगांवमध्ये निर्माण झाली आहे का? असा उद्विग्न सवाल माणगांवमधील सुजाण नागरिक उपस्थित करत असून अशी चर्चा माणगाव तालुक्यातील बऱ्याच अश्या नाक्या-नाक्यावर दबक्या आवाजात सुरू आहे. यावर आळा बसत नसेल तर माणगाव तालुक्यातील सुरक्षा यंत्रणेतील वरिष्ठ अधिकारी करताहेत तरी काय? यावर काही उपाय योजना होणार की नाही? पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. अशी मागणी देखील महाराष्ट्र शासनाकडे केली जाणार असल्याची माहिती माणगावमधील सुजाण नागरिकांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.