अमुलकुमार जैन
रायगड : रायगड जिल्ह्यातील अलिबाग शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या सुजलाम नगर येथील लंकेश भगवान नागावकर (वय ३८ वर्ष, फ्लॅट नं. 201, फेज-2, अनुप्रभा कॉ. ऑप. हौ. सोसा.) यांच्याकडे घरफोडी होवून अज्ञात चोरट्याने ५ लाख ९४ हजार ७०० किमतीचा ऐवज लंपास केला असल्याची तक्रार लंकेश नागावकर यांनी अलिबाग पोलिस ठाण्यात दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 30/11/2024 ते दि. 01/12/2024 दरम्यान लंकेश नागावकर यांचे राहते घरी फ्लॅट नं. 201, फेज -2, अनुप्रभा कॉ. ऑप. हौउ सोसायटी, सुजलाम नगर, पिंपळभाट,अलिबाग येथे फिर्यादी यांचे दि. 30/11/2024 रोजी सांयकाळी 6 वा. ते दि. 1/12/2024 रोजी सकाळी 8 वाजताचे दरम्यान फिर्यादी यांचे राहते घरी घरफोडी करीत अज्ञात चोरट्याने रु. १,२०,०००/- किंमतीचे चार तोळे वजनाचे मंगळसुत्र, ६०,०००/- किंमतीचा दोन तोळे वजनाचा सोन्याचा हार, ६०,०००/- किमतीच्या प्रत्येकी १ तोळे वजनाच्या २ सोन्याच्या अंगठया, ९०,०००/- किमतीच्या पाच ग्रॅम वजनाच्या ६ चिप, १,०५,०००/- किमतीचे साडे तीन तोळे वजनाचे ६ कानातळे जोड, १५,०००/- किमतीची पाच ग्रॅम वजनाची नथ, ४५,०००/-किमतीचे १.५ तोळे वजनाचे मुलीचे सोन्याचे कानातले ५ जोड, १५,०००/-किमतीची पाच ग्रॅम वजनाची चैन, ८२,०००/- रुपये रोख रक्कम, २०००/- किंमतीचे चांदीचे २ कॉईन, ५००/- किंमतीचे चांदीचे पैंजण २ जोड, २००/- किंमतीचे चांदीचे जोडवी २ असा एकुण ५,९४,७०० रूपये ऐवज बंद घराचे सेप्टी डोअरची कडी तोडून अज्ञात चोराने लंपास केला आहे.
याबाबत अलिबाग पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 235/2024 BNS 331(3), 331(4), 305 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास अलिबाग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली महीला पोलिस उप निरीक्षक शिंदे ह्या करीत आहेत.