प्रतिनिधी
नागोठणे : येथिल को. ए. सो. आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आंतरराष्ट्रीय एड्स दिवसानिमित्त पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिनेश भगत यांच्या हस्ते फित कापून या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी समाजात एड्स या रोगाबद्दल जनजागृती व्हावी, त्या रोगाबद्दलचे गैरसमज दूर व्हावे, त्याचे संक्रमण होण्याची कारणे व त्या रोगावरील उपाययोजना ई. संदेश देण्याचा या पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्याचा हेतू होता. या प्रदर्शनात २० पोस्टर व ४० विद्यार्थी सहभागी झाले होते. रेड रिबन क्लबच्या स्वयंसेवकांनी कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. श्रीकृष्ण तुपारे, डॉ. मनोहर शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली मेहनत घेतली. याप्रसंगी प्रा. डॉ. विजय चव्हाण, डॉ. विलास जाधवर, प्रा. हेमंत जाधव यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. या प्रोस्टर प्रदर्शनाचे परिक्षण डॉ. राणी ठाकरे यांनी केले.