• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

सीएफआय व बीएनवाय यांच्या संयुक्त विद्यमाने हडपसर येथील सानेगुरुजी शाळेचे सुशोभीकरण

ByEditor

Dec 2, 2024

विनायक पाटील
पेण :
सीएफआय व बीएन वाय यांच्या मार्फत हडपसर व फुरसुंगी येथील शाळांमध्ये विद्यार्थी तसेच शाळेच्या गरजेनुसार अनेक समाजउपयोगी तसेच शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. यामध्ये मुलांसाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन, मुलांसाठी संगणक कक्ष, सायन्स लॅब, प्रोजेक्टर तसेच शाळेचे रंगरंगोटीचे काम हे आणि असे विविध उपक्रम राबविले जातात. याचा एक भाग म्हणून सीएफआय संस्थेचे संचालक डॉ. किशोर देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर येथील सानेगुरुजी प्राथमिक स्कूल येथे रंगरंगोटीचे काम सीएफआय व बीएनवाय यांच्या माध्यमातून करण्यात आले.

यासाठी सर्व शिक्षक वर्ग, विद्यार्थी, शाळेचे अध्यक्ष तसेच पालकांनी सीएफआय व बीएनवाय यांचे आभार मानले. यावेळी सीएफआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर देशमुख, सानेगुरुजी स्कूलचे मुख्याध्यापक जगताप मॅडम, रासकर मॅडम, इनामदार मॅडम व आबा तुपे सर, शिंदे सर व बीएनवाय कंपनीचे हेड नाझणीन मॅडम, कर्मचारी वर्ग व सीएफआयचे सोशल वर्कर हेमंत अणदुरकर उपस्तिथ होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!