• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

संगमेश्वर येथे सापडला संशयित टँकर; एकजण ताब्यात

ByEditor

Jul 23, 2023

अमूलकुमार जैन
अलिबाग :
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे संशयित टँकर पकडला असून एकाला ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी भ्रमणध्वनीवरून दिली आहे. मुंबई पोलिसांनला संशयास्पद कॉलटँकरमधून आरडीएक्स गोव्यात नेल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात एक संशयास्पद टँकर जप्त करण्यात आला आहे.टँकरच्या तपासणीसाठी तज्ज्ञांच्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे. टँकरमध्ये स्फोटक आरडीएक्स ठेवले होते की नाही, याचा तपास केला जाईल.

रत्नागिरी पोलिसांनी नाकाबंदी करून संशयित टँकर अडवला होता. टँकरमधून आरडीएक्स गोव्यात नेल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी टँकर चालकाला ताब्यात घेतले आहे. संशयित टँकरबाबत अज्ञात व्यक्तीने फोनवरून पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली होती. या टँकरमध्ये दोन पाकिस्तानी नागरिकही असल्याचे फोन करणाऱ्याने सांगितले. केमिकलने भरलेला टँकर पकडला आहे.

या टँकरच्या तपासासाठी तज्ज्ञांच्या पथकाला पाचारण करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. टँकरमध्ये स्फोटक आरडीएक्स ठेवले होते की नाही, याचा तपास केला जाईल.मुंबई पोलिसांच्या वतीने असे सांगण्यात आले आहे की मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला धमकीचा कॉल आला होता, ज्यामध्ये कॉलरने चेतावणी दिली की RDX आणि दोन पाकिस्तानी नागरिकांचा टँकर मुंबईहून गोव्याकडे जात आहे. फोन करणाऱ्याने स्वतःची ओळख पांडे अशी करून दिली. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!