• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी गिरीष तुळपुळे यांची तर दीपक साळवी यांची शासकिय परिषदेवर सदस्यपदी निवड

ByEditor

Jul 23, 2023

क्रीडा प्रतिनिधी
अलिबाग :
रायगड जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष गिरीष तुळपुळे यांची महाराष्ट्र राज्य कॅरम असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी तर झुंझार युवक मंडळ पोयनाडचे खजिनदार तथा रायगड जिल्हा कॅरम असोसिएशनचे सचिव दीपक साळवी यांची महाराष्ट्र राज्य कॅरम असोसिएशनच्या शासकिय परिषदेवर सदस्य म्हणून सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

शनिवार, दिनांक २२ जुलै २०२३ रोजी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा व चौवार्षिक निवडणूक दादर क्लब मुंबई येथे पार पडली. २०२३ ते २०२७ ह्या कालावधीसाठी हि निवडणूक घेण्यात आली. पुढील चार वर्षासाठी हि कार्यकारणी कार्यरत असणार आहे. रायगड जिल्ह्यातील दोन कर्तबगार व्यक्तींची पुन्हा एकदा महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या कार्यकारिणीत निवड झाल्याने जिल्ह्यातील कॅरम असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, सदस्य, खेळाडूंनी आनंद व्यक्त करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!