• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व अजित पवार घेणार शपथ

ByEditor

Dec 5, 2024

मुंबई : राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आज शपथ घेणार आहेत. त्यांच्या नेतृत्त्वात महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे. मात्र, त्यांच्या सोबत एकनाथ शिंदे हे शपथ घेणार का या बाबत स्पष्टता नव्हती. देवेंद्र फडवणीस यांनी शिंदे यांची रात्री वर्षा बंगल्यावर भेट घेतली असून त्यांची मनधरणी करण्यात त्यांना यश आली आहे. आज ते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. तर अजित पवार देखील उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

एकनाथ शिंदे आज संध्याकाळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मात्र, ते मंत्रिमंडळात कोणते पद घेणार याबाबत चित्र स्पष्ट झालेले नाही. तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री होणारे भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची वर्षा बांगल्यावर रात्री भेट घेतली. या भेटीत शिंदे यांची मनधरणी करण्यास त्यांना यश आले आहे. त्यामुळे आज प्रामुख्याने तिघांचा शपथविधी होणार आहे.

एकनाथ शिंदे यांची गृहमंत्री पदाची मागणी

एकनाथ शिंदे हे गृहखात्याच्या मागणीवर अडून बसल्यामुळे आजच्या शपथविधीत शिंदे हे शपथ घेणार की नाही हा प्रश्नचिन्ह होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांची समजूत काढली. त्यांनी शिंदे यांच्या मागणीचा सकारात्मकदृष्टीने विचार केला जाईल. पण तुम्ही आझाद मैदानावर आज आमच्या सोबत शपथ घ्या, असे म्हणत त्यांची मनधरणी केली. आम्ही दोघांनीच आज शपथ घेतली तर ते योग्य दिसणार नाही. आपण गेले दोन वर्ष एकत्र काम केले आहे. तुमच्या मागण्यांवर वरिष्ठाकंडून विचार केला जात असून शपथ विधीत सहभागी व्हा अशी विनंती केली. शिंदे यांनी फडणवीस यांची मागणी मान्य केली असून आज ते आझाद मैदानावर शपथ घेतील.

शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांनी बुधवारी शिंदे यांची भेट घेऊन फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होणाऱ्या नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची विनंती केली. पक्षाच्या आमदारांनी सांगितले की, गेल्या दोन दिवसांपासून काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन त्यांना नव्या सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी राजी केले जात आहे. दिवसभर आमदार मावळत्या मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेत होते. त्यामुळे पक्ष आणि सरकार दोघांनाही फायदा होणार असल्याने आम्ही त्यांना नव्या सरकारमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे, अशी माहिती आमदार भरत गोगावले यांनी दिली. आम्हाला आशा आहे की ते आमच्या विनंतीचा आदर करतील. शिंदे यांनी नव्या सरकारमध्ये सहभागी व्हावे, अशी सर्व आमदार आणि खासदारांची इच्छा आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!