• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मंत्रिमंडळातील संभाव्य नावांची यादी समोर, अनेक नव्या चेहऱ्यांचा समावेश

ByEditor

Dec 6, 2024

मुंबई: राज्याच्या मुख्यमंत्रि‍पदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदची शपथ घेतली. यानंतर महायुती सरकारमध्ये मंत्री कोण होणार? कोणतं खातं कुणाला मिळणार? अजित पवार आणि शिंदे गटाला किती मंत्रीपदं मिळणार? याची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चा सुरू असतानाच महायुतीच्या संभाव्य मंत्रिमंडळाची यादी समोर आली आहे. या यादीत अनेक नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे.

महायुती सरकारच्या शपथविधीनंतर हिवाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. राज्यात 288 आमदार संख्या आहे. मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाची मर्यादा 43 इतकी आहे. त्यामुळे यापेक्षा जास्त कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांची संख्या असू शकत नाही. अशातच महायुती सरकारमध्ये कोणाला मंत्रिपद मिळू शकतं याची संभाव्य यादी समोर आली आहे. या यादीतील नावं पाहून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.

भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी-

  1. देवेंद्र फडणवीस
  2. गिरीश महाजन
  3. रविंद्र चव्हाण
  4. मंगलप्रभात लोढा
  5. चंद्रशेखर बावनकुळे
  6. आशिष शेलार
  7. नितेश राणे
  8. शिवेंद्रसिंहराजे भोसले
  9. राहुल कुल
  10. माधुरी मिसाळ
  11. संजय कुटे
  12. राधाकृष्ण विखे पाटील
  13. गणेश नाईक
  14. पंकजा मुंडे
  15. गोपीचंद पडळकर

शिवसेना शिंदे गटाची संभाव्य मंत्र्यांची यादी-

  1. एकनाथ शिंदे
  2. उदय सामंत
  3. शंभूराज देसाई
  4. गुलाबराव पाटील
  5. संजय शिरसाट
  6. भरत गोगावले
  7. प्रकाश सुर्वे
  8. प्रताप सरनाईक
  9. तानाजी सावंत
  10. राजेश क्षीरसागर
  11. आशिष जैस्वाल
  12. निलेश राणे

अजित पवार गटाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी-

  1. अजित पवार
  2. अदिती तटकरे
  3. अनिल पाटील
  4. हसन मुश्रीफ
  5. धर्मराव बाबा अत्राम
  6. धनंजय मुंडे
  7. छगन भुजबळ

कालिदास कोळंबकर विधानसभेचे हंगामी अध्यक्ष

भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर आज हंगामी अध्यक्ष म्हणून राजभावनात जाऊन शपथ घेणार आहे. विशेष अधिवेशनामध्ये नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यासाठी हंगामी अध्यक्षांची निवड केली जाते. आज या हंगामी अध्यक्षांना शपथ दिली जाईल. 7, 8 आणि 9 डिसेंबर या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशन दरम्यान हे हंगामी अध्यक्ष विधानसभेतील नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!