• Sat. Mar 14th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

आनंदीबाई प्रधान महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

ByEditor

Dec 7, 2024

प्रतिनिधी
नागोठणे :
येथील कोएसो आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिनेश भगत यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला व दीपप्रज्वलन करून अभिवादन केले.

या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. श्रीकृष्ण तुपारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकत त्यांचे कार्य आपल्याला सदैव प्रेरणा देत राहील असे सांगितले. या अभिवादन सभेसाठी प्रा. डॉ. विजय चव्हाण, प्रा. जयेश पाटील, डॉ. मनोहर शिरसाठ, डॉ. विकास शिंदे, सौ. ज्योती पाटील यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!