• Fri. Jun 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरणचा १३ वर्षीय आर्य किशोर पाटील १८ डिसेंबरला करणार जागतिक विक्रम

ByEditor

Dec 10, 2024

घन:श्याम कडू
उरण :
उरण, केगाव-दांडा येथे राहणारा १३ वर्षीय आर्य किशोर पाटील एका नव्या जागतिक विक्रमसाठी सज्ज झाला आहे. १८ डीसेंबर २०२४ रोजी हा विक्रम तो करणार आहे.

धरमतर जेट्टी ते कासा खडक हे सागारी २४ किमी अंतर तो “बटरफ्लाय” या जलतरण प्रकारातून पोहून पार करणार आहे. यामुळे तो खुल्या समुद्रातील २४ किमी “बटरफ्लाय” प्रवाह पोहून जाणारा जगातील पहिला बाल जलतरणपटू ठरणार आहे. बटरफ्लाय हा प्रकार अत्यंत ताकदीचा आणि दमछाक करणारा प्रकार असल्याने या विक्रमासाठी आर्य उरणच्या खुल्या समुद्रामध्ये तसेच नगरपरिषदेच्या जलतरण तलावामध्ये दररोज सहा तासांचा सरावं देखील करत आहे. आर्य उरणच्या सेंट मेरीज कॉन्व्हेंट स्कुलमधील आठवी इयत्तामध्ये शिकत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!