विश्वास निकम
कोलाड : रोहा तालुक्यातील आंबेवाडी नाका येथील विजय वाईन शॉपच्या बाजूला असणाऱ्या सागर टी स्टॉल समोर उभी असणारी टु व्हीलर चोरीला गेल्याची घटना घडली असुन दिवसेंदिवस चोरीच्या घटनेत वाढ होतांना दिसत आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील आंबेवाडी नाका येथील सागर टी स्टॉलच्या बाजूला सुभम शिवकुमार सिंह यांची टुव्हिलर गाडी अव्हेंजर २२०, गाडी नंबर एमएच ०६ बीएन ८९३० ही गाडी रविवार, दि. ८ डिसेंबर २०२४ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरीला गेली असुन ही टुव्हीलर गाडी कोणाच्या निदर्शनास आली तर त्वरित ७२७६८०८९१४ तसेच ९१४६६५९६५७ या मोबाईलवर संपर्क साधावा अशी विनंती टुव्हीलर मालक शुभम यांच्याकडून करण्यात आली आहे.