• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महायुती सरकारच्या मंत्र्यांना बंगल्यांचं वाटप, आदिती तटकरेंना प्रतापगड, भरत गोगवलेंना सुरुची – ०२ बंगला

ByEditor

Dec 23, 2024

मुंबई : महायुती सरकारच्या मंत्र्यांना दालनापाठोपाठ बंगल्यांचंदेखील वाटप करण्यात आलं आहे. महायुती सरकारमधील सर्व मंत्र्यांना बंगल्यांचं वाटप करण्यात आलं आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना रामटेक बंगला देण्यात आला आहे. तर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना पर्णकुटी बंगला देण्यात आला आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे राज्याचे महसूल मंत्री आहेत. तर पंकजा मुंडे या पर्यावरण मंत्री आहेत. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना ज्ञानेश्वरी बंगला देण्यात आला आहे. तर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शिवगिरी बंगल्याचं वाटप करण्यात आलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना रामटेक तर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना रॉयलस्टोन बंगला देण्यात आला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांना (क-८) विशाळगड बंगला देण्यात आला आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांना ब-१ सिंहगड देण्यात आला आहे.

वाचा मंत्र्यांच्या बंगल्यांची यादी

  • राम शिंदे, (सभापती, विधान परिषद) – ज्ञानेश्वरी
  • राहुल नावेकर (अध्यक्ष विधानसभा) – शिवगिरी
  • चंद्रशेखर बावनकुळे – रामटेक
  • राधाकृष्ण विखे-पाटील – रॉयलस्टोन
  • हसन मुश्रीफ – क-८ विशाळगड
  • चंद्रकांतदादा पाटील – ब-१ सिंहगड
  • गिरीश महाजन – सेवासदन
  • गुलाबराव पाटील – जेतवन
  • गणेश नाईक – ब-४ पावनगड
  • दादा भुसे – ब-३ जंजीरा
  • संजय राठोड – शिवनेरी
  • धनंजय मुंडे – सातपुडा
  • मंगलप्रभात लोढा – ब-५ विजयदुर्ग
  • उदय सामंत – मुक्तागिरी
  • जयकुमार रावल – चित्रकूट
  • पंकजा मुंडे – पर्णकुटी
  • अतुल सावे – अ-३ शिवगढ़
  • अशोक उईके – अ-९ लोहगड
  • शंभूराजे देसाई – मेघदूत
  • आशिष शेलार – व-२ ररत्नसिंधू,
  • दत्तात्रय भरणे – ब-६ सिध्दगड
  • अदिती तटकरे – अ-५ प्रतापगड
  • शिवेंद्रराजे भोसले – ३-७ पन्हाळगड
  • माणिकराव कोकाटे – अंबर-२७
  • जयकुमार गोरे – क-६ प्रचितीगड
  • नरहरि झिरवाळ – सुरुचि ०९
  • संजय सावकारे – अंबर-३२
  • संजय शिरसाठ – अंबर-३८
  • प्रताप सरनाईक – अवंती-५
  • भरत गोगावले – सुरुचि ०२
  • मकरंद पाटील – सुरुचि-०३

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!