• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित ‘दि कैंपोलियन क्लब टी-२०’ क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ

ByEditor

Dec 23, 2024

क्रीडा प्रतिनिधी
अलिबाग :
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित दि कैंपोलियन क्लब टी-२० नॉकआऊट क्रिकेट स्पर्धेचा सोमवार, दि. २३ डिसेंबरपासून रायगड जिल्ह्यातील विविध मैदानावर शुभारंभ झाला. रायगड जिल्ह्यातील नामवंत ३२ अकॅडमी/क्लब ह्या स्पर्धेमध्ये सहभागी होणार असून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या आंतरजिल्हा निवड चाचणी टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्याचा संघ ह्या स्पर्धेतून निवडला जाणार आहे.

रंगीत कपडे व पांढऱ्या चेंडूवर सदरची स्पर्धा आयोजित केली आहे. रायगड जिल्ह्यातील खारघर येथील बी. पी. पाटील मैदान, घरत क्रिकेट मैदान, साईसुरज मैदान, पनवेल येथील ४०प्लस गावदेवी टेंभोडे मैदान व पेण येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सदस्य समीर मसुरकर यांच्या खोपोली येथील मालकीच्या असलेल्या “दि कैंपोलियन क्लब” थ्री स्टार हॉटेल रिसॉर्ट यांनी हि स्पर्धा प्रायोजित केली आहे. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने गेल्या दोन महिन्यात सोळा, एकोणीस व तेवीस वर्षाखालील मुलांच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचे यशस्वीरीत्या आयोजन केले असून आतापर्यंत ११६ एकदिवसीय सामने पूर्ण केले आहेत. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सचिव प्रदिप नाईक यांच्यासह सर्व कार्यकारणीचे पदाधिकारी, सदस्य यांनी सहभागी संघांना शुभेच्छा दिल्या आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!