• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

कळंबुसरे ते कोप्रोली रस्त्यावरील साकवाचे काम सुरु

ByEditor

Dec 23, 2024

अनंत नारंगीकर
उरण :
तालुक्यातील पुर्व विभागातील गावांना जोडणाऱ्या कळंबुसरे ते कोप्रोली रस्त्यावरील जिर्ण झालेल्या साकवाचे नव्याने काम सार्वजनिक बांधकाम विभाग उरण ने हाती घेतले आहे. त्यामुळे प्रवाशी नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.

उरण तालुक्याचा विकास हा जेएनपीए बंदराच्या माध्यमातून झपाट्याने होत आहे.त्यामुळे उरण पुर्व विभागातील गाव परिसरात ही मालाची आयात निर्यात करणाऱ्या गोदामांची संख्या वाढत चालली आहे. पुर्व विभागातील गावांना जोडण्याचे काम कळंबुसरे ते कोप्रोली हा रस्ता करत आहे. या रस्त्यावरुन सातत्याने मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वर्दळ असल्याने कळंबुसरे – मोठी जुई खाडीवरील साकव हा जिर्ण झाल्याने रात्री अपरात्री अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सदर साकवाचे नव्याने काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घ्यावे अशी मागणी सातत्याने प्रवाशी नागरीकांकडून करण्यात येत होती. सार्वजनिक बांधकाम विभाग उरणचे उप अभियंता नरेश पवार यांनी सदर मागणीची दखल घेऊन कळंबुसरे – मोठी जुई खाडीवरील साकवाचे काम नव्याने हाती घेतल्याने प्रवाशी नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!