• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

नाताळच्या सुट्टीमुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा

ByEditor

Dec 25, 2024

कोलाड नाक्यावर वाहतूक कोंडी, प्रवाशी नागरिक त्रस्त

विश्वास निकम
कोलाड :
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील कोलाड बाजापेठेत बुधवार, दि. २५ डिसेंबर २०२४ रोजी नाताळच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गोव्याकडे जाण्यासाठी पर्यटकांनी पहाटे ६ वाजल्यापासून गर्दी केली असुन यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक कोंडी निर्माण झाली. यामुळे यातून मार्ग काढतांना प्रवाशांची तारांबळ उडाली असल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड (आंबेवाडी) बाजारपेठेत चौपदरीकरणाचे काम सुरु असल्यामुळे येथील येणारी जाणारी वाहतूक बायपास रस्त्यावरून वळविण्यात आली आहे. परंतु, नाताळची सुट्टी असल्यामुळे असंख्य पर्यटक सुट्टीचा आनंद घेण्यासाठी टुव्हीलर, फोर व्हिलर, एसटी बस, प्राव्हेट बस तसेच मिळेल त्या वाहनाने गोव्याकडे निघाले आहेत. यामध्ये भरीतभर म्हणून अरुंद रस्त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असुन यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली असल्यामुळे प्रवाशी वर्ग त्रस्त झाले असल्याचे दिसून आले.

मुंबई-गोवा महामार्गावरील पुई महिसदरा नदीच्या पुलापासून कोलाड नाक्यापर्यंत दोन किलोमीटरच्या अंतरावरील रस्ता हा सिंगल असल्यामुळे येथून वाहन चालकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. येथील रस्त्याची अवस्था अतिशय बिकट असुन यामुळे नागरिकांची मार्ग काढतांना तारांबळ उडाली. पुई महिसदरा नदी पुलापासून कोलाड तसेच तळवलीपर्यंत एका बाजूच्या मार्गाचे काम सुरु असुन येणारी जाणारी वाहतूक दुसऱ्या बाजूने वळविण्यात आली आहे. यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत असुन याचा नाहक त्रास प्रवाशी वर्गाला सहन करावा लागत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!