• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रदेश प्रभारीपदी नियुक्ती

ByEditor

Dec 28, 2024

मुंबई : माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष संघटनेच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपने पक्षाच्या संघटनात्मक बांधणीचे नियोजनाची जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्याकडे सोपवली आहे. डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे रविंद्र चव्हाण आमदार असून ते राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आहे. त्यांनी 2002 साली राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी डोंबिवली मतदारसंघातून चौथ्यांदा बाजी मारली आहे. यंदा देखील त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची चर्चा जोराने सुरु होती मात्र त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. तर आता भाजपने त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. त्यांची महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष संघटनेच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!