• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर बावीस वर्षीय नराधमाकडून अत्याचार; मुरुड तालुक्यातील घटना

ByEditor

Dec 29, 2024

अमुलकुमार जैन
रायगड :
जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील एका गावात बावीस वर्षीय नराधमाकडून सात वर्षीय मुलीवर शारीरिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार झाल्याचे उघड झाले आहे. नराधमानी चिमुकल्या मुलीवर अत्याचार केल्याचे समोर आले असल्याने मुरुडसह अलिबाग तालुका हादरला आहे. आरोपी हा फरार झाला असून पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली चार ते पाच पथकं नेमून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस विभागाकडून मिळाली आहे.

रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील एका गावात सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या घराजवळ असलेल्या समुद्रकिनारी नेवून तिच्यावर शाररिक अत्याचार केला आहे. याबाबतची फिर्याद पीडित मुलीच्या आईने रेवदंडा पोलिस ठाण्यात दिली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुरुड तालुक्यातील एका गावात दि. 27 डिसेंबर 2024 रोजी दुपारी दोन वाजून तीस मिनिटाच्या सुमारास सात वर्षीय पीडित मुलगी ही तिचा भाऊ आणि बहीण यांच्यासोबत शौचास गेली होती. सदर ठिकाणी आरोपी याने येवून पिडीत मुलगी ही अल्पवयीन आहे हे माहीत असताना तिचे अज्ञानाचा फायदा घेवून तिला एकटीलाच समुद्र किनारी उभ्या केलेल्या एका बोटीत घेवून जावून तेथे तिच्यावर शारीरीक अत्याचार केला. याबाबत रेवदंडा पोलिस ठाण्यात दि. 28 डिसेंबर 2024 रोजी रात्री अकरा वाजून 32 मिनिटांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेत नराधमाने समुद्रकिनारी असलेल्या एका होडीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्या मुलीने याबाबत कोणालाही काही सांगू नये तसेच घरी जावून होडीचा गळ गुप्तांगला लागला आहे असे सांगण्यास भाग पाडले व तिच्या हातावर मारहाण देखील केली आहे. याबाबत अधिक तपास मुरुड पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली महीला पोलिस उप निरीक्षक एम. टी. शिंदे या करीत आहेत.

बावीस वर्षीय नराधम याच्यावर यापूर्वी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असून या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जोर धरत आहे. ही घटना अत्यंत नीच वृत्तीची आहे. काही दिवसापूर्वी कल्याणमध्ये देखील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रकार घडला होता. अशा घटनेतील आरोपी यांना शासनाने कठोरात कठोर शिक्षा द्यावी आणि हा खटला जलदगतीने न्यायलायात चालविण्याची मागणी सामजिक कार्यकर्त्या रुपाली पेरेकर यांनी केली आहे.
या प्रकरणाची माहिती मिळताच मुरुड पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात पाठवून सदर पीडित मुलीची चौकशी करण्याची सूचना केली आहे. तसेच तिला पोलिस विभागाकडून सर्वतोपरी न्याय मिळणार असल्याची ग्वाही रायगड जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

याबाबत रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि.नं.व कलम1कॉ.गु.रजि.नं.१७२/२०२४ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ६५ (२),६४ (एल) सह लैंगिक अत्याचार १७२/२०२४ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम अपराधापासुन बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२चे कलम ३ (बी), ४(२), ५ (एम), ६(१), ७,८, ९ (एच), ९ (एम), १०, १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!