• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

कलावंतीण सुळका धोकादायक; पर्यटकांवर निर्बंध, जमावबंदी लागू

ByEditor

Jul 26, 2023

पनवेल : पर्यटकांसाठी साहसी सुळका म्हणून प्रसिद्ध असलेल्या पनवेलमधील माचीप्रबळ आदिवासी वाडीजवळील कलावंतीण सुळका धोकादायक झाला असल्याचे समोर आले आहे. महसूल आणि पोलिस प्रशासनाने पाहणी केल्यानंतर तहसीलदार कार्यालयाकडून या भागात जाण्यावर निर्बंध आणले. जमावबंदी लागू करून या भागात जाणाऱ्या पर्यटकांना डोंगराच्या पायथ्याशी अडविले जात आहे.

खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीत घडलेल्या दुर्घटनेनंतर निद्रिस्त महसूल प्रशासन खडबजून जागे झाले आहे. पनवेल तालुक्यातील माचीप्रबळ डोंगर हा पर्यटकांसाठी आकर्षण आहे. उन्हाळा वगळता दीड ते दोन तासांचा माचीप्रबळ गड चढून वाडीवर मुक्काम करणारे पर्यटक मोठ्या संख्येने वाढले आहे. माचीप्रबळ आदिवाडीपासून काही अंतरावर असलेल्या कलावंतीण सुळक्यावर लावलेल्या २० ते २५ फूट दोरीवर चढून वर जाण्याचा साहसी प्रकारही पर्यटक अनुभवतात. पावसाळ्यात कलावंतीण सुळक्यावर जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करतात. कलावंतीण सुळक्याचा भाग वर उभे राहिल्यावर हलत असल्याचे लक्षात आले होते. प्रशासनाला ही बाब समजल्यानंतर पनवेल तहसील कार्यालयाचे तलाठी आणि पोलिस प्रशासनाने सोमवारी डोंगरावर जाऊन पाहणी केली. त्यानंतर कलावंतीण डोंगरावर चढण्यास मज्जाव करण्यात आला. वर्षानुवर्षे या डोंगरावर ट्रेकर्स जातात. आदिवासींनी वर राहण्याची, जेवणाची सोय केल्यामुळे पर्यटक कुटुंबासह मुक्काम करतात. परंतु आता पुढील काही कालावधीसाठी कलावंतीणवर चढणे बंद करण्यात आले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!