मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे खासदार रविंद्र वायकर यांच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. जोगेश्वरीच्या एसआरपीएफ कॅम्पच्या प्रवेशद्वाराजवळ हा अपघात झालाय. या अपघातावेळी खासदार रविंद्र वायकर हे गाडीत होते अशीही माहिती समजते. अद्याप अपघातात कोणी जखमी किंवा जिवितहानी झालीय का याची माहिती समजू शकलेली नाही.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, खासदार रविंद्र वायकर यांच्या गाडीचा पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ अपघात झाला. जोगेश्वरीच्या एसआरपीएफ कॅम्पच्या प्रवेशद्वाराजवळ ही दुर्घटना घडलीय. यावेळी खासदार रविंद्र वायकर हे गाडीत होते असेही समजते. दरम्यान, चालक मद्यधुंद अवस्थेत होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक चौकशी केली जात आहे.