क्रीडा प्रतिनिधी
अलिबाग : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या खुल्या गटातील आंतरजिल्हा निवड चाचणी टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी काल रायगड जिल्ह्याचा संघ जाहीर करण्यात आला आहे. पेण स्पोर्ट्स असोसिएशनचा अष्टपैलू खेळाडू सिध्दांत म्हात्रे याला कर्णधार व अलिबाग क्रिकेट अकॅडमी संघाचा तंत्रशुद्ध फलंदाज ऋषिकेश राऊत याची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे.
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा जाहीर झालेला संघ
सिद्धांत म्हात्रे (कर्णधार), हृषिकेश राऊत (उपकर्णधार), श्रेयस कुमार, ओम जाधव (यष्टीरक्षक), देवांश तांडेल, समीर आवास्कर, प्रतीत गोटसुर्वे (यष्टीरक्षक) चैतन्य पाटील, संतोष गोस्वामी, ओंकार महाडिक, मिहिर भाटकर, तेजस मोहिते, कौस्तुभ म्हात्रे, नसीब नाईक
राखीव खेळाडू – अभिषेक खातू, साई साखरकर, तहा चिचकर, कौस्तुभ चौधरी आणि पश्चिम विभागासाठी प्रतिक म्हात्रे, रितेश तिवारी, संकेत गोवारी, अभिषेक जैन, अभिषेक नाईक यांची निवड करण्यात आली आहे.
आरडीसीएतर्फे संघ निवडकर्ता म्हणून महाराष्ट्राचा माजी रणजीपटू पुष्कराज चव्हाण, योगेश पवार, उदय गद्रे, मैल्कम मोंटेरो यांनी काम पाहिले तर मुख्य प्रशिक्षक म्हणून शंकर दळवी, संघ प्रशिक्षक म्हणून रवी सोलंकी, संघ व्यवस्थापक सागर मुळे काम पाहणार आहेत. जाहीर झालेला संघ पहिल्या दोन सामन्यासाठी असणार असून मंगळवार, दि. ३१ डिसेंबरपासून एमसीएच्या स्पर्धेत सहभागी होईल. रायगडच्या संघाला पाच टी-२० क्रिकेट सामने खेळायचे आहेत. रायगडच्या संघाला आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सचिव प्रदिप नाईक यांच्यासह सर्व पदाधिकारी, सदस्य यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.