• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

नागोठणे रेल्वे स्थानकातील विविध समस्या व मागण्यांबाबत रेल्वे प्रशासनाला निवेदन

ByEditor

Jan 1, 2025

नागोठणे : दर तासाला रोहा-दिवा-रोहा, रोहा-कल्याण मेमू सुरु करणे, दिवा-सावंतवाडी-दिवा (गाडी क्र. १०१०५-१०१०६) ह्या गाडीला नागोठणे स्थानकावर पूर्ववत थांबा देणे, चंदिगढ-एरनाकुलम-चंदिगढ-गोवा-केरळ संपर्कक्रांती (गाडी क्र. १२२१७-१२२१८) गाडीला नागोठणे स्थानकावर थांबा मिळणे, प्लॅटफॉर्म क्र. २ व ३ ची उंची वाढविणे आदी मागण्यांकरिता रेल्वे सल्लागार समिती, रेल्वे प्रवासीजन नागोठणे व भाजपा पदाधिकारी यांनी रेल्वे प्रशासनाला निवेदन दिले.

नागोठणे रेल्वे स्थानक संबंधित प्रवासी सुविधेबद्दल सुचना व मागण्यांचे निवेदन नागोठणे स्टेशन मास्तर यांना देण्यात आले. यावेळी रोहा तालुका महामंत्री आनंद लाड, रोहा तालुका सरचिटणीस व प्रवासी रेल्वे संघटना सदस्य एकनाथ ठाकूर, रोहा तालुका क्रीडा सहयोग शेखर गोळे, रोहा तालुका शिक्षण सेल उपाध्यक्ष व रेल्वे प्रवासी संघटना सदस्य धनराज उमाळे, भाजपा कार्यकर्ते तिरथ पोलसानी उपस्थित होते.

नागोठणे रेल्वे स्थानक संबंधित प्रवासी सुविधेबद्दल सुचना व मागण्या

१) दर तासाला रोहा – दिवा-रोहा, / रोहा-कल्याण – रोहा, रोहा – डहाणू – रोहा अश्या स्वरूपात मेमू किंवा लोकल सेवा चालू करणे.

२) दिवा – सावंतवाडी – दिवा, गाडी क्रमांक (१०१०५ – १०१०६) ह्या गाडीला नागोठणे स्थानकावर पूर्ववत थांबा देणे.

३) चंदिगढ – एरणाकुलम – चंदिगढ – गोवा – केरळ संपर्कक्रांती गाडी क्रमांक (१२२१७ – १२२१८) नागोठणे स्थानकावर थांबा मिळणे.

४) बांद्रा टर्मिनल- मडगाव गाडी क्रमांक (१०११५ – १०११६) गाडीला नागोठणे स्थानकावर थांबा मिळणे.

५) कोच्चीवल्ली हजरत निजबुद्दिन एरणाकुलम गाडी क्रमांक (१२६१७ – १२६१८) एक्स्प्रेस नागोठणे स्थानकावर थांबा मिळणे.

६) भावनगर – गांधीधाम- तिरुवअनंतपुरम एक्स्प्रेस गाडी क्रमांक (१९२६० – १९२५९) नागोठणे स्थानकावर थांबा मिळणे.

७) मस्यगंधा एक्स्प्रेस गाडी क्रमांक (१२६१९ – १२६२०) थांबा मिळणे.

८) हप्पा मडगाव गाडी क्रमांक (२२९०८- २२९०७) थांबा मिळणे.

९) प्लॅटफॉर्म नंबर २ व ३ ची उंची वाढविणे.

१०) प्लॅटफॉर्म नंबर १ वरून प्लॅटफॉर्म नंबर २ व ३ नंबरवर जाणार पादचारी पुल मधोमध बांधणे आणि शक्यतो भविष्याचा आणि वयस्कर माणसांचा विचार करून सरकते जिने बांधण्याची तरतूद करणे.

११) एकदिवसीय टुरिस्ट पास उपलब्ध करून देणे.

सदर मागण्यांच्या निवेदनाची प्रत खा. सुनील तटकरे, खा. धैर्यशील पाटील, आ. रवीशेठ पाटील यांना देण्यात आली असून सदर मागण्यांबाबत पाठपुरावा करण्याची विनंती करण्यात आली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!