औषध व फळवाटप कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न!
प्रतिनिधी
माणगाव : माणगाव तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. सालाबादप्रमाणे यावर्षीही तालुका पत्रकार संघातर्फे उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे सोमवार, दि. ६ जानेवारी २०२५ रोजी पत्रकार दिनानिमित्त औषध व फळवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

औषध व फळ वाटप कार्यक्रम माणगाव नगरीच्या नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे, राजिपचे माजी शिक्षण व आरोग्य समिती सभापती ज्ञानदेव पवार, उद्योजक रामनारायण मिश्रा, उद्योजक मंगेश पोळेकर, माजी सभापती संगीता बक्कम, उपनगराध्यक्षा हर्षदा काळे, नगरसेविका ममता थोरे, भाजपच्या संयोजिका शर्मिला सत्वे, सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा जाधव, आदर्श शिक्षक शंकर शिंदे, व्यापारी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण दळवी, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सलीम शेख, कार्याध्यक्ष प्रभाकर मसुरे, उपाध्यक्ष मजिद हाजीते, पत्रकार संघाचे मार्गदर्शक विजयशेठ मेथा, सल्लागार सुभाष दळवी, आजेश नाडकर, पत्रकार स्वप्न साळुंके, आरोही सुर्वे, व्यापारी निलेश लिलाचंद शेट व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी माणगाव उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधीक्षक अरुणा पहुरे, आदर्श शिक्षिका विनया जाधव यांनी पत्रकार संघाच्या कार्याचा गौरव करीत पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवर तसेच पत्रकारांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. सुरुवातीला माणगाव तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष प्रभाकर मसुरे यांनी पत्रकार संघाच्या गेल्या आठ वर्षाच्या काळातील कार्यक्रमांचा सविस्तर आढावा घेत उपस्थित सर्व मान्यवर व पत्रकार यांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात प्रभारी वैद्यकीय अधीक्षक अरुणा पहुरे, नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे, राजिपचे माजी शिक्षण व आरोग्य समिती सभापती ज्ञानदेव पवार, माजी सभापती संगीता बक्कम, आदर्श शिक्षिका विनया जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन पत्रकार संघाला पत्रकार दिनाच्या खास शुभेच्छा दिल्या. तसेच पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सलीम शेख व कार्याध्यक्ष प्रभाकर मसुरे तसेच पत्रकार संघाचे सर्व सहकारी यांचे अभिनंदन केले.
पत्रकार दिनानिमित्त आयोजित औषध व फळ वाटप कार्यक्रमास सिद्धी दखिणकर, माणगावमधील विवीध क्षेत्रातील मान्यवर मंडळी, उपजिल्हा रुग्णालयाच्या परिचारिका, वॉर्डबॉय, कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माणगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सलीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ पत्रकार मजिद हाजिते, कार्याध्यक्ष प्रभाकर मसुरे, मार्गदर्शक विजयशेठ मेथा, सल्लागार सुभाष दळवी, आजेश नाडकर, स्वप्ना साळुंके, शिवम कॉम्पुटर सेंटरचे संस्थापक भालचंद्र खाडे, सामाजिक कार्यकर्ते संजय गांधी आदींसह संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी विशेष सहकार्य करीत परिश्रम घेऊन पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.