प्रतिनिधी
नागोठणे : येथील कोएसो आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्र अंतर्गत ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रंथ दिंडीचे विधीवत पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिनेश भगत यांच्या हस्ते करण्यात आले. या ग्रंथ दिंडीचा मुख्य उद्देश समाजामध्ये वाचन संस्कृती वाढावी हा आहे.

या ग्रंथ दिंडीमध्ये भारतीय संविधान, भगवत गीता, पारायण, ज्ञानेश्वरी, रसायन शास्त्र, भौतिकशास्त्र , संगणक शास्त्र व जीवशास्त्र विषयांचे संदर्भ ग्रंथ आदी पुस्तकांचा समावेश करण्यात आला होता. या ग्रंथ दिंडीत कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. श्रीकृष्ण तुपारे, वनस्पती विभाग प्रमुख डॉ. विजय चव्हाण, ग्रंथालय प्रमुख हेमंत जाधव, प्रा. डॉ. सतिष पाटील, प्रा. डॉ. विलास जाधव, प्रा. डॉ. मनोहर शिरसाठ, प्रा. जयेश पाटील, डॉ. विकास शिंदे, डॉ. राणी ठाकरे आदींसह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. दिनेश भगत यांच्या मार्गदर्शनाखाली रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. श्रीकृष्ण तुपारे, ग्रंथपाल हेमंत जाधव व डॉ. मनोहर शिरसाठ यांनी केले.