• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

गडप्रेमींसाठी सुवर्णसंधी! राज्यस्तरीय किल्ले रायगड गडारोहण स्पर्धेचे आयोजन

ByEditor

Jan 7, 2025

सलीम शेख
माणगाव :
श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ स्थानिक उत्सव समिती महाड यांच्यावतीने प्रतिवर्षीप्रमाणे राज्यस्तरीय किल्ले रायगड गडारोहण स्पर्धेचे आयोजन रविवार, दि. १२ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ७ वाजता किल्ले रायगड येथे करण्यात आले आहे. स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने प्रतिवर्षीप्रमाणे किल्ले रायगड येथे सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व वयोगटासाठी ही स्पर्धा असून चित्तदरवाजा -महादरवाजा -हत्ती तलावाच्या डावीकडून होळीचा माळ असा स्पर्धेचा मार्ग असणार आहे. रविवार दि. १२ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ७ वाजता स्पर्धा सुरू होणार आहे . स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क 30 रुपये असणार आहे. नावे नोंदणीसाठी ११ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजता पाचाड धर्मशाळा येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. सर्वांसाठी भोजन व्यवस्था शनिवारी रात्री तसेच रविवार दि. १२जानेवारी रोजी अल्पाहार देण्यात येणार आहे.

पारितोषिक वितरण १२ जानेवारी २०२५ रोजी सकाळी दहा वाजता किल्ले रायगड येथे होणार आहे. प्रथम गट १४ वर्षाखालील मुले – १/१/२०११ नंतरची जन्मतारीख असावी. पुरुष द्वितीय गट – १४ वर्षे पूर्ण ते १७ वर्षापर्यंत – १/१/२००८ ते ३१/१२/२०१० अशी जन्मतारीख असावी. पुरुष तृतीय गट – १७ वर्ष पूर्ण ते २१ वर्षापर्यंत १/१/२००४ ते ३१/१२/२००७ जन्मतारीख. पुरुष चतुर्थ गट – २१ ते ३० वर्षापर्यंत १/१/१९९५ ते ३१/१२/२००३ जन्मतारीख. पुरुष पाचवा खुला गट – ३१/१२/१९९४ पूर्वीचा जन्म असावा. महिला प्रथम गट – १४ वर्षापर्यंत १/१/२०११ नंतर जन्म असावा. महिला द्वितीय गट – १४ वर्षे पूर्ण ते सतरा वर्षापर्यंत १/१/२००८ ते ३१/१२/२०१० पर्यंत जन्म असावा. महिला तृतीय खुला गट – ३१/१२/२००७ पूर्वीचा जन्म असावा.

विजेता स्पर्धकांना एकूण प्रत्येक गटांमध्ये पाच बक्षिसे देण्यात येणार आहे. प्रथम क्रमांक – रोख पारितोषिक रुपये ५०००/-, द्वितीय क्रमांक रोख पारितोषिक ४ हजार रुपये, तृतीय क्रमांक रोख पारितोषिक ३०००/-, चतुर्थ क्रमांक २०००/- व पाचव्या क्रमांकास १०००/- रुपये रोख बक्षीस दिले जाणार आहे. स्पर्धेसाठी जन्मतारखेचा पुरावा आवश्यक राहील, सत्यप्रत जोडावे. अंतिम निर्णय स्पर्धा संयोजकांचा राहणार आहे. पत्रक पूर्णपणे भरल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही. अठरा वर्षाखालील स्पर्धकांच्या पालकांनी प्रवेश पत्रावर सही करावी. स्पर्धकांनी अकरा तारखेला सायंकाळी सात वाजता पाचाड धर्मशाळा या ठिकाणी उपस्थित रहावे.

या स्पर्धेचे स्पर्धा प्रमुख म्हणून योगेश भागवत, निशांत देशमुख हे काम पाहत आहेत. या स्पर्धेमध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन कार्यवाह संतोष कदम यांनी केले आहे. या स्पर्धेत नाव नोंदणी करण्यासाठी महेश गायकवाड पाचाड (८१४९२४८८७२), अविनाश चव्हाण (९८९०४२३४७८), संतोष माटेकर (७७७४८७८४३२), श्रीकृष्ण गरधे (७७७४८७८४३२), विनोद लाड (७५८८९००४४७), यतिराज पाटील (९९२११७१७००), संतोष जोरकर (९४२१०९२९१४), सुधीर थोरात (९४२२०९६५३९), रुपेश मोरे (९२७२७२४६०९), ऋषिकेश जगदाळे (९९२११७१७००) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!