अलिबाग : निहार प्रॉपर्टी अँड लीगल सोल्युशन, लायन्स क्लब श्रीबाग सेन्टेनिअल, स्वरांकिता अकॅडमी, जिल्हा सामान्य रुग्णालय, माणुसकी प्रतिष्ठान, दोस्त मुंबईतील प्रसिद्ध डॉ जावडे व प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग यांच्या माध्यमातून पोलीस रेझिंग डे सप्ताह अंतर्गत जंजिरा सभागृह पोलीस मुख्यालय, अलिबाग या ठिकाणी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अलिबाग पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व ॲड. निहा अनिस राऊत यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये गर्भाशय कॅन्सर, नेत्ररोग, अस्थिरोग, पोटाचे विकार, रक्त तपासणी, ई सि जी यांसह मोफत औषधोपचार करण्यात आले.

या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, डॉ. राहुल शर्मा, अडिशनल एसपी अभिजित शिवथरे, होम डीवायएसपी, अलिबाग पोलीस निरीक्षक किशोर साळे, निहार प्रॉपर्टी अँड लीगल सोल्युशनच्या ॲड. निहा राऊत, स्वरांकिता अकॅडमी कला पाटील, माणुसकी प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. राजाराम हूलवान, स्त्रीरोग तज्ञ डॉ. मेघा घाटे, सिव्हिल हॉस्पिटल डॉ. अंबादास देवमाने यांची टीम डॉ. करण वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी केले तर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या आरोग्य तपासणी शिबिराला शुभेच्छा देत रेझिंग डे सप्ताहा विषयी माहिती दिली. ॲड. निहा राऊत यांनी या तपासणी शिबिरात सहभागी झालेल्या नागरिकांना बहुमोल मार्गदर्शन केले. साधारण 200 नागरिक व पोलीस यांनी या शिबिराचा लाभ घेतला. मुंबई येथील सुप्रसिद्ध निष्णात अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. राहुल शर्मा यांनी पोलिसांची मने जिंकली. लायन्स हेल्थ फाऊंडेशनच्या डॉ. शुभदा अणि टीमने नेत्र तपासणी करून मोतीबिंदूचे ऑपरेशन चोंढी येथे करण्याची ग्वाही दिली. डेंटिस्ट डॉ. अक्षय कोळी यांनी दातांची तपासणी करुन कशी काळजी घ्यावी याबाबत सांगितले. कला पाटील यांच्या गाण्याने शिबिराची सुरुवात झाली. डॉ. राजाराम हुलवान यांनी सर्वांचे आभार मानत व सर्व चोवीस तास काम करणाऱ्या पोलिसांची आरोग्याची जबाबदारी घेणे गरजेचे असल्याचे सांगत कार्यक्रमाची सांगता केली.
