अनंत नारंगीकर
उरण : जासई उड्डाण पूलावर ड्रंम्परने मोटारसायकला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघाता मोटारसायकल स्वार गंभीर जखमी झाला आहे. सदर अपघात हा शुक्रवारी (दि. १०) सायंकाळी ठिक ५-३० च्या दरम्यान झाला आहे.
उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल दहीफळे व त्यांच्या पोलीस सहकार्याने घटनास्थळी धाव घेऊन जखमी व्यक्तीला उलवे नोड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असल्याची माहिती सूत्रांकडून समजते. या अपघात प्रसंगी उड्डाण पूलावरुन जाणाऱ्या प्रवाशांनी तात्काळ जखमींना सहकार्य केल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. मात्र अपघाताचे नेमके कारण सध्या तरी समजू शकले नाही. तरी वाहन चालकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
